MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

ओबीसींवर अन्याय होणार नाही, पडताळणी करुनच जात प्रमाणपत्र द्यावे, ओबीसी उपसमितीच्या बैठकीत बावनकुळेंचे निर्देश

Written by:Astha Sutar
बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि जो मराठा आरक्षणाचा जीआर होता, तो आम्ही वाचला तसेच छगन भुजबळ यांनाही वाचण्यास दिला. ओबीसी समाजातील लोकांना जात प्रमाणपत्र देत असताना पूर्णतः खबरदारी आणि खात्री करूनच द्यावे.

OBC Sub Committee – ओबीसी समाजाचे प्रश्न, समस्या तसेच ओबीसींचे जात प्रमाणपत्र याबाबत आज (बुधवारी) मुंबईत ओबीसी उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ, ओबीसी उपसमितीची अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. मराठा समाजासाठी आरक्षणाबाबत जो जीआर काढला आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षणावरती घाला येतोय, ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण जाते, असं ओबीसी समाजाच्या नेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ज्यांचे मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा असे कागदपत्रे किंवा वंशावळ आहे. अशांनाच मराठा जात प्रमाणपत्र दाखले द्यावे, अशी मागणी ओबीसी समाजाच्या नेत्यांनी केली आहे.

सरसकट जात प्रमाणपत्र दाखले देऊ नका…

दरम्यान, आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि जो मराठा आरक्षणाचा जीआर होता, तो आम्ही वाचला तसेच छगन भुजबळ यांनाही वाचण्यास दिला. ओबीसी समाजातील लोकांना जात प्रमाणपत्र देत असताना पूर्णतः खबरदारी आणि खात्री करूनच द्यावे. किंवा ज्यांचे वंशावळ किंवा पुरावे आहेत, त्यांनाच जात ओबीसीचे जात प्रमाणपत्र द्यावे. चुकीच्या पद्धतीने किंवा सरसकट ओबीसींना जात प्रमाणपत्र देऊ नये, अशी बैठकीत चर्चा झाली, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले. ओबीसी उपसमितीची बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमाचे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

वंशावळ, पुरावे बघूनच जात प्रमाणपत्र

मराठा जात प्रमाणपत्र देताना त्यांना मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा अशी वंशावळ किंवा पुरावा असेल तरच त्यांना जात प्रमाणपत्र द्यावे, अशी बैठकीत चर्चा झाली. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणावर कुठेही घाला येणार नाही. किंवा त्यांच्या न्याय हक्कावर कुठे गदा येणार नाही. याबाबत ओबीसी उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली. याबाबत आढावा घेतला. तसेच आम्ही जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनाही निर्देश दिलेले आहेत, असं बावनकुळे म्हणाले.

छगन भुजबळ नाराज नाहीत…

दुसरीकडे मराठा आरक्षण जीआर काढल्यामुळे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. आणि जीआरमधील काही शब्द आहेत. त्याच्यावर आपला आक्षेप आहे, असं म्हणत ते कोर्टात धाव घेणार आहेत, असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला असता, आजच्या बैठकीत छगन भुजबळ यांनाही जीआर वाचायला दिला. जे काही दोन-तीन शब्द आहेत, त्याबाबत ही आम्ही बैठकीत चर्चा केली.

परंतु सरसकट मराठ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार नाही, ज्यांचे कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी असे दाखले, पुरावे किंवा वंशावळ आहेत, अशांना जात प्रमाणपत्र सादर केले जाणार आहे. त्यामुळं छगन भुजबळ हे सरकारमधील मंत्री आहेत, छगन भुजबळ नाराज नसल्याचे मंत्री बावनकुळे यांनी म्हटले.