india vs pakistan asia cup 2025 – पांरपरिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आज (रविवारी 14 सप्टेंबरला) महामुकाबला होणार आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी या मोहिमेत विजयी सुरुवात केली आहे. टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. आशिया कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर संघ आमनेसामने असणार आहेत. दरम्यान, भारत-पाकिस्तान मॅचला विरोधकांकडून विरोध होत असताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
जय शहांचा खेळाडूवर दबाव
दरम्यान, आज शिवसेना उबाठा गटाकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. तसेच दिल्लीतील आम आदमी पार्टीने दिल्लीत कोणत्याही हॉटेल मालकाने भारत-पाकिस्तान मॅच टीव्ही स्क्रीनवर दाखवू नये, असं आवाहन केलं आहे. तर भारत-पाकिस्तान मॅचला खेळण्यावरून विरोध वाढत असताना खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दुसरीकडे हल्यातील शहिदांचे अजून रक्तही सुकले नसताना पाकिस्तानबरोबर मॅच कशासाठी खेळायची, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला असताना, मॅच खेळण्यासाठी खेळाडूंवरती आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांचा दबाव असल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खेळाडूंवर जय शहांचा दबाव आहे, त्यामुळं हा सामना होत आहे.

खेळाडूंचाही मॅचला विरोध?
दुसरीकडे खासदार संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार संघातील काही खेळाडूंचा देखील मॅच खेळण्यास विरोध आहे असल्याची माहिती आहे. माजी क्रिकेटपटू तसेच सेलिब्रिटींचाही या मॅचला विरोध आहे. परंतु मॅच खेळण्यासाठी जय शहा यांचा क्रिकेटपटूवरती दबाव असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, खा. संजय राऊत यांच्या या आरोपाला आता सत्ताधारी कसे उत्तर देतात .हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या सामन्याला काही राजकीय पक्षांनी देखील केलं आहे. दिल्ली, यूपी, महाराष्ट्र आदी राज्यात राजकीय पक्षांनी क्रिकेट सामन्याला विरोध केला आहे.











