शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभर ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलन, मॅच हॉटेल मालकांनी टिव्हीवर न दाखवण्याचं केलं आवाहन

उबाठाकडून राज्यभर ‘माझं कुंकू माझा देश’ या आंदोलनाद्वारे या सामन्याचा तीव्र विरोध केला आहे. संपूर्ण राज्यभर म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी पक्षाकडून आंदोलन करण्यात आले.

India vs Pakistan, Asia Cup 2025 – टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. आशिया कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर संघ आमनेसामने असणार आहेत. पांरपरिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आज (रविवारी 14 सप्टेंबरला) महामुकाबला होणार आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी या मोहिमेत विजयी सुरुवात केली आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तान मॅचला विरोधकांकडून विरोध होत असताना आज शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभर ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलन करण्यात आलं.

मोदींना कुंकू पाठवणार

दरम्यान, आज आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र, या सामन्याविरोधात राज्यात तीव्र संताप पाहायला मिळत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यभर ‘माझं कुंकू माझा देश’ या आंदोलनाद्वारे या सामन्याचा तीव्र विरोध केला आहे. संपूर्ण राज्यभर म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी पक्षाकडून ‘माझं कुंकू माझा देश’ आंदोलन करण्यात आलं आहे. हल्लातील आमच्या मात भगिनी अजून सावरल्या नाहीत. अशा पाकिस्तानसोबत क्रिकेट काय म्हणून खेळायचे, याचा आम्ही निषेध करतो, आणि पंतप्रधान मोदींनी आम्ही सर्व भगिनी कुंकू पाठवणार असल्याचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

देशभरातून सामन्याला विरोध

भारत आणि पाकिस्तान सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. भारताविरुद्ध सतत दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतीय क्रिकेट संघानं सामने खेळू नये. यासाठी केंद्र सरकारनं ठोस भूमिका घ्यावी, असं विरोधकांनी म्हटलं आहे. खरं तर, पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात देशभर संतापाची लाट उमटली आहे. ज्यांनी आमच्या माणसांना मारलं त्यांच्यासोबत क्रिकेट नको… या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय…अशी घोषणाबाजी आंदोलनकांनी दिल्या. तर या सामन्याला काही राजकीय पक्षांनी देखील केलं आहे. दिल्ली, यूपी, महाराष्ट्र आदी राज्यात राजकीय पक्षांनी क्रिकेट सामन्याला विरोध केला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News