हे आहेत जगातील सर्वात सुरक्षित फोन, VVIP आणि गुप्तचर संस्थादेखील वापरतात

Boeing या कंपनीने तयार केलेला हा फोन संरक्षण आणि सरकारी कामकाजासाठी वापरला जातो. याची खासियत म्हणजे यामध्ये सेल्फ-डिस्ट्रक्टिंग फिचर आहे.

Most Secure Phones in the world : डिजिटल युगात डेटा प्रायव्हसी आणि सायबर सुरक्षा ही सर्वात मोठी गरज बनली आहे. सर्वसामान्य व्यक्तींचा विषय बाजूला ठेवा, पण जेव्हा गुप्तचर संस्था, सैन्यातील अधिकारी किंवा एखाद्या VVIP व्यक्तींसाठी त्यांचा स्मार्टफोन खूप महत्वाचा असतो. जो केवळ तांत्रिकदृष्ट्याच नाही, तर अत्यंत सुरक्षितही असावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया अशा ६ सर्वात सुरक्षित स्मार्टफोन्सबद्दल, जे CIA एजंट्स, सरकारी अधिकारी आणि हाय प्रोफाईल व्यक्ती वापरतात.

Blackphone 2 (Silent Circle)

हा फोन त्यांच्यासाठी आहे, जे गोपनीयतेला सर्वाधिक प्राधान्य देतात. हा फोन Silent OS वर चालतो, जो Android वर आधारित आहे. पण त्यामधून सर्व ट्रॅकिंग आणि डेटा शेअरिंग फिचर्स हटवण्यात आले आहेत. यामध्ये एनक्रिप्टेड कॉल, मेसेज आणि सुरक्षित ब्राउझिंगसारख्या सुविधा दिल्या आहेत.

Boeing Black

Boeing या कंपनीने तयार केलेला हा फोन संरक्षण आणि सरकारी कामकाजासाठी वापरला जातो. याची खासियत म्हणजे यामध्ये सेल्फ-डिस्ट्रक्टिंग फिचर आहे. म्हणजेच फोनमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास हा फोन स्वतः नष्ट होतो. त्यामुळे डेटा लीक होण्याची शक्यता उरत नाही.

Sirin Labs Finney

हा एक ब्लॉकचेन-आधारित स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये मल्टी-लेयर सायबर प्रोटेक्शन असते. यात क्रिप्टोकरन्सीसाठी कोल्ड स्टोरेज वॉलेट आणि सुरक्षित कम्युनिकेशन टूल्सदेखील उपलब्ध आहेत. हा फोन विशेषतः क्रिप्टो वापरकर्ते आणि VVIP व्यक्तींमध्ये लोकप्रिय आहे.

Purism Librem 5

हा एक ओपन-सोर्स लिनक्स आधारित फोन आहे, जो युजरला त्याच्या गोपनीयतेवर पूर्ण नियंत्रण देतो. यामध्ये कॅमेरा, मायक्रोफोन, Wi-Fi इत्यादींसाठी हार्डवेअर किल-स्विच दिलेले आहेत, ज्यामुळे गरज असल्यास हे संपूर्णपणे बंद करता येतात.

Apple iPhone (iOS 17 किंवा त्यानंतरचे व्हर्जन)

हा फोन सामान्य वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय असला तरी त्याचे सुरक्षा फीचर्स इतके मजबूत आहेत की सरकारी यंत्रणादेखील याचा वापर करतात. यामध्ये Secure Enclave, एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सारख्या सुविधा आहेत ज्या याला अत्यंत सुरक्षित बनवतात.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News