मुंबईत जे जे रुग्णालयात मोफत रोबोटिक शस्त्रक्रिया, कशाप्रकारे होते रोबोटिक शस्त्रक्रिया? खर्च किती?

सर जे. जे. रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जात आहे. या रोबोटिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून विविध आजारांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे एक मिनिमली इनवेसिव्ह प्रक्रिया आहे.

Robotic Surgery : राज्यातील प्रमुख सरकारी रुग्णालयांपेखी मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय हे एक महत्वाचे रुग्णालय मानले जाते. येथे दररोज हजारो रुग्ण मुंबई तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात. दरम्यान, आता या रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया होत आहेत. मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय हे पहिले रुग्णालय आहे, जिथे रोबोटिक शस्त्रक्रिया पार पडली आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात रोबोटिक शस्त्रक्रिया पार झाली. या रोबोटिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी मोफत केली जात असून, त्यामुळं रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.

आत्तापर्यंत किती यशस्वी शस्त्रक्रिया?

दरम्यान, वैद्यकीय शिक्षण विभागाने सर जे. जे. रुग्णालयात ही रोबोटिक प्रणाली बसविली आहे. यासाठी सुमारे ३२ कोटी रुपयांच्या खर्च आली असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले आहे. जे जे रुग्णालयात सुरू करण्यात आलेली रोबोटिक शस्त्रक्रिया रुग्णासाठी मोठा आधार ठरत आहे. रोबोटिकच्या माध्यमातून आत्तापर्यंत साधारण १२५ एवढ्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दरम्यान, खासगी रुग्णालयांमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी साधारण 3 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. पण सरकारी जे. जे. रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जात आहे. असं जे. जे. रुग्णालयातील डॉ. सुप्रिया भोंडवे यांनी सांगितले आहे.

कमी वेळत अचूक निदान

मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जात आहे. या रोबोटिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून विविध आजारांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे एक मिनिमली इनवेसिव्ह प्रक्रिया आहे, ज्यात रोबोटिक उपकरणांच्या मदतीने सर्जन नाजूक आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करतात. सध्या भारताने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केलीय. आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीच्या माध्यमातून कमी वेळेत अचूक आणि पारदर्शक काम करण्याचे लोकांचा कल वाढत आहे. दरम्यान, या रोबोटिक शस्त्रक्रियेचा फायदा म्हणजे अचूक निदान, कमी वेदना, कमी रक्तस्त्राव आणि जलदगतीने आजार रिकव्हर होण्यास मदत करत, असं डॉ. सुप्रिया भोंडवे यांनी सांगितले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News