दिवाळी हा सण आनंद आणि उत्साह घेऊन येतो. या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देतात, मिठाई, गिफ्ट्स देतात, विविध पदार्थांची देवाणघेवाण होते. या विशेष दिवशी लोक अनेक प्रकारचे पदार्थ बनवतात, परंतु या दिवशी पाहुण्यांना थंड पेय काय देऊ हे समजत नाही. म्हणूनच आज आपण पाइनअॅपल शेक कस बनवायचं हे पाहणार आहोत….
साहित्य
- अननसाचा रस
- दूध
- साखर
- फ्रेश क्रिम
- संत्र्याचा रस
- लिंबाचा रस
- ड्राय फ्रुट्स
- आइस क्यूब

कृती
- एक अननस सोलून मग कापून घ्या.
- त्याचे लहान तुकडे करुन ते मिक्सरमध्ये घाला.
- अननसाचा रस, संत्र्याचं रस आणि लिंबाचा रस एकत्र करून त्यामध्ये साखर एकत्र करा.
- आता हे मिश्रण फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी कमीत कमी अर्ध्या तासासाठी तसचं ठेवा.
- त्यानंतर ज्यूस आणि दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये आइस क्यूब घालून पुन्हा मिक्सरमध्ये एकत्र करून घ्या.
- ग्लासमध्ये शेक ओतून लगेच पाहुण्यांना सर्व्ह करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











