ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा अनेक बहिणींना लागून राहिली आहे. अशातच आता यासंदर्भातील मोठी माहिती समोर आलीये. लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांचा हप्ता मिळतो. आता नोव्हेंबर महिना उजाडला तरी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेलाा नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. अशा परिस्थितीत नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता आता धुसर दिसत आहे.
ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
महाराष्ट्र सरकारने गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. दर महिन्याला योजनेसाठी पात्र लाडक्या बहिणींना सरकारकडून 1500 रुपये दिले जातात. मात्र दिवाळी आणि ऑक्टोबर महिना उलटून गेली तरी अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता आता धुसर दिसत आहे. शिवाय या हप्त्याच्या तारखेबाबतही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मात्र, महाराष्ट्रात महानगरपालिका, नगरपरिषद, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू होईल आणि यादरम्यान कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत देणं शक्य नसतं. तेव्हा लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता हा पुढील आठ दिवसात मिळण्याची शक्यता आहे.
बहिणींनो, ई-केवायसी पूर्ण करून घ्या!
योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. केवळ लाभार्थी महिलेचेच नाही, तर त्या महिलेचे पती किंवा वडिलांचे ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, सरकार आता लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासोबतच तिच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न पडताळून पाहणार आहे.
- लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
- संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
- तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल. प्रोसेस पूर्ण होईल.
यामध्ये विवाहीत महिलांना आपल्या पतीची आणि मुलींना आपल्या वडिलांची ई-केवायसी देखील करून घ्यावी लागणार आहे. निर्धारीत मुदतीमध्ये प्रक्रिया पार पाडावी लागेल.
आदिती तटकरेंचे महिलांना काय आवाहन?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून माहिती दिली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. तसेच 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध आहे. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आतापर्यंत बहुतांशी लाडकी बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र उर्वरित लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. असे मी आवाहन करते असे यावेळी तटकरे म्हणाल्या.











