लवकरच दिवाळी येतेय.. त्या निमित्ताने अनेक घरात साफसफाईला सुरूवात झालीय. तर काही ठिकाणी दिवाळीचा फराळ आणि मिठाई बनवायचाही तयारी झालीय. दिवाळीचा सण जसजसा जवळ येतो तसतसा आपल्याला मिठाईचा सुगंध आणि गोडवा जाणवू लागतो. आपल्यापैकी बहुतेक लोकांना काजूची बर्फी अर्थात काजू कत्री आवडते. दिवाळीसारख्या उत्सवाच्या दिवसांत कुठल्याही घरात काजू बर्फी सहज मिळतात. ही लोकप्रिय मिठाई आपण आपल्या घरी सहजपणे बनवू शकता….
साहित्य
- 1/2 कप काजू
- 1/2 कप दूध
- 1 1/2 चमचे तूप
- 1 कप साखर
- 4 इंच सिल्वर वर्क
- 1 चमचा हिरवी वेलची पावडर
कृती
- प्रथम काजू आणि दुधाची एकत्र करून त्यांची बारीक पेस्ट बनवा.
- यानंतर या पेस्टमध्ये साखर घालून मंद आचेवर शिजवा.
- साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण ढवळा.
- मिश्रण मध्यम आचेवर सतत ढवळत राहा आणि मिश्रण पिठासारखे दिसू लगून भांड्याची कडा सोडू लागले की त्यात वेलची पावडर मिसळून गॅसची आच बंद करा.
- एका ताटाला अथवा तत्सम भांड्याला तूप लावून त्या पात्रात हे मिश्रण काढून घ्या. व्यवस्थित पसरून, थंड होण्यासाठी ठेवून द्या.
- नीट सेट झाल्यावर त्यावर सजावटीसाठी चांदीचा वर्ख लावून त्याच्या वड्या कापून घ्या आणि खाण्यास सर्व्ह करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












