Diwali 2025 : खाऱ्या शंकरपाळ्या बनवण्याची झटपट रेसिपी…

खाऱ्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी, मैदा, जिरे, ओवा, मीठ आणि इतर मसाले एकत्र करून घट्ट कणिक मळा. ही कणिक लाटून त्याचे चौकोनी तुकडे करून मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा.

दिवाळी तोंडावर आली आहे. दिवाळी म्हंटली की फराळ हा आलाच; घरात करंजी, शंकरपाळी, लाडू, चिवडा यांसारखे गोड-तिखट पदार्थ बनवले जातात, दिवाळीत सतत गोड, गोड खाऊन कंटाळा आला की काहीतरी चटपटीत खावंस वाटतं. अशावेळी तुम्ही खाऱ्या शंकरपाळ्या खाऊन फराळाचा आनंद घेऊ शकता…

साहित्य

  • १ कप मैदा
  • १/२ टीस्पून तिखट
  • १/४ टीस्पून मीठ
  • १/४ टीस्पून जिरे
  • १/४ टीस्पून ओवा
  • १/४ टीस्पून हिंग
  • १/८ टीस्पून हळद
  • २ टेबलस्पून गरम तेलाचे मोहन
  • १/४ कप पाणी (गरजेनुसार)
  • तळण्यासाठी तेल 

कृती

  • एका मोठ्या भांड्यात मैदा, तिखट, मीठ, जिरे, ओवा, हिंग आणि हळद एकत्र करा.
  • त्यात गरम तेलाचे मोहन घाला आणि पिठाला चांगले चोळा.
  • थोड्या-थोड्या प्रमाणात पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्या. कणिक जास्त सैल नसावी. 
  • मळलेल्या कणकेची एक जाडसर पोळी लाटा.
  • पोळीचे चौकोनी किंवा तुम्हाला हव्या त्या आकारात शंकरपाळे कापून घ्या. 
  • एका कढईत तेल गरम करा. तेल मध्यम आचेवर गरम झाल्यावर त्यात शंकरपाळे सोडा. 
  • शंकरपाळे मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. 
  • तळलेले शंकरपाळे पेपर टॉवेलवर काढून घ्या जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
  • थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News