महाराष्ट्रात मार्गशीर्ष गुरुवारी म्हणजेच महालक्ष्मी व्रत मोठ्या भक्तिभावाने केले जाते. या व्रतामध्ये भक्त लक्ष्मीला सजवतात आणि तिची पूजा करतात. या विशेष प्रसंगी शुभेच्छा संदेश देखील पाठवले जातात. चला तर मग उद्याच्या मार्गशीर्ष गुरुवार व श्री महालक्ष्मी व्रताच्या तुमच्या प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा…
मार्गशीर्ष गुरूवारचे महत्व
मार्गशीर्ष गुरूवार या दिवशी लक्ष्मी-नारायणाची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी आणि भरभराट येते. या दिवशी उपवास करून कलश स्थापना करून लक्ष्मीची पूजा केली जाते. या पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक संपन्नता लाभते, असे मानले जाते. मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला प्रिय मानला जातो. या महिन्यात येणाऱ्या गुरुवारचे विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी केलेल्या पूजेने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन-धान्याची वृद्धी होते. महाराष्ट्रात मार्गशीर्ष गुरूवार मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी दारात रांगोळी काढून, लक्ष्मीची पाऊले काढून पूजा केली जाते. अनेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात.

मार्गशीर्ष गुरूवार निमित्त शुभेच्छा संदेश..
ॐ महालक्ष्मी नमः ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः ।
मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा!
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
मार्गशीर्ष गुरूवारच्या हार्दिक शुभेच्छा!
समृद्धी यावी सोन पावली
उधळणं व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा,
वर्षा व्हावी हर्षाची
इंद्रधनुष्याचे रंग फुलावेत
शुभेच्छा मार्गशीष गुरूवार व्रताच्या!
शुभ गुरूवार!!!
सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा..
येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि भरभराटीचा असावा,
हीच महालक्ष्मी चरणी इच्छा
मार्गशीर्ष गुरूवारच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबकेगौरी
नारायणी नमोऽस्तुते ।
मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!
मार्ग- मार्ग नेहमी असा असावा की जिथे
शीर्ष- शीर्ष नम्रतेने सदा झुकलेले असावे
गुरू- गुरू असा असावा की ज्याच्या कडून
वार- वारंवार योग्य मार्गदर्शन लाभावे.
मार्गशीर्ष गुरूवारच्या हार्दिक शुभेच्छा !
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,राजलक्ष्मी..
या मार्गशीर्ष महिन्यात या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
मार्गशीर्ष गुरूवारच्या शुभेच्छा !
हे लक्ष्मी माते तू ये कुंकवाच्या पावलांनी,
नाव तुझं जपतो सदैव मनी,
मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार,
महालक्ष्मी व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो…
महालक्ष्मी व्रताच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
महालक्ष्मीच्या आगमनाने
पूर्ण होतात मनोकामना
घरात नांदते सुख समृद्धी
देवीची तुम्हावर कृपा व्हावी
हीच प्रार्थना देवीच्या चरणी
मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा !
आद्यन्तरहित देवी आद्यशक्तिमहेश्वरी ।
योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोऽस्तुते
मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा !
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











