दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांची जयंती साजरी केली जाते, जी दत्तात्रेय जयंती आणि दत्त जयंती म्हणून ओळखली जाते. हा दिवस दत्तगुरुंच्या आशीर्वादाने पवित्र आणि शुभ मानला जातो. या दिवशी शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही आपल्या प्रियजनांचा दिवस खास बनवू शकता आणि त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता.
दत्तात्रेय हा कोणाचा अवतार आहेत?
दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींचे एकत्र रूप आणि अवतार मानले जातात. त्यांना विष्णूचा सहावा अवतार मानले जाते आणि ते कलियुगातील देवता आहेत.

- त्रिमूर्ती अवतार: दत्तात्रेय हे ब्रह्मा (निर्माता), विष्णू (पालनकर्ता) आणि शिव (संहारक) या तिन्ही देवतांचे एकत्रित रूप आहेत.
- विष्णूचा अवतार: त्यांना विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी सहावा अवतार मानले जाते. काही ठिकाणी त्यांना चौथा किंवा सातवा अवतार देखील म्हटले जाते.
- कलियुगातील देवता: दत्तात्रेय हे कलियुगातील देव मानले जातात आणि त्यांची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते.
दत्त जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश…
चरण शुभंकर फिरता तुमचे
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले
मला ते दत्तगुरु दिसले
श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!
ज्याच्या ह्रदयात गुरु मूर्ती
त्याची होई जगभरात किर्ती
जो करेल गुरुची पूजा
त्याच्या आयुष्यातून संकटे होईल वजा
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
शिकवितो जो जगण्याचा सार
तोच तू आमुचा एकमेव आधार
तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार
कितीही अडथळे आले तरी आम्ही माणनार नाही हार
दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा..!
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!’
‘गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर:
गुरुर साक्षात परम ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:
श्री दत्त जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!’
अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन
मी तूपणाची झाली बोळवण, एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
गुरूवीण कोण दाखविल वाट,
आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…
दत्त जयंतीच्या खास शुभेच्छा…
आता नको दिव्यदृष्टी, आता नको ही जडसृष्टी
फक्त असावी आपल्यावर, आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
दत्त जयंतीनिमित्त आपल्या
जीवनात नवे उत्साह निर्माण होवो.
दत्त जयंतीच्या शुभेच्छा!
दत्तगुरूंच्या कृपाशिर्वादाने
तुमचे जीवन सुख, शांती आणि
समाधानाने भरले जावो.
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
त्रिभुवनी पसरे भक्तीचा सागर
होता साक्षात्कार घडतो चमत्कार
गुरूमाऊली चरणी माझा नमस्कार
दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा..
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











