लवकरच दिवाळी येतेय.. त्या निमित्ताने अनेक घरात साफसफाईला सुरूवात झालीय. तर काही ठिकाणी दिवाळीचा फराळ आणि मिठाई बनवायचाही तयारी झालीय. दिवाळीचा सण जसजसा जवळ येतो तसतसा आपल्याला मिठाईचा सुगंध आणि गोडवा जाणवू लागतो. सणासुदीच्या काळात मिठाई नसेल असं एकही घर नाही. प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी मिठाई नक्कीच दिली जाते. आज आम्ही तुम्हाला घरी सोप्या पद्धतीने आणि मावा केक कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहोत…
साहित्य
- मावा (खवा)
- मैदा
- साखर
- तूप
- बेकिंग पावडर
- वेलची पूड (ऐच्छिक)
- ड्रायफ्रुट्स (ऐच्छिक)
कृती
- एका भांड्यात मावा कुस्करून घ्या.
- त्यात साखर आणि तूप घालून मिश्रण एकजीव करा.
- आता यात मैदा आणि बेकिंग पावडर चाळून घाला.
- मिश्रण हळूहळू एकत्र करा. जास्त फेटू नका.
- जर ड्रायफ्रुट्स वापरणार असाल, तर ते या मिश्रणात घाला.
- बेकिंग टिनला तूप लावून मैद्याने डस्ट करा.
- तयार मिश्रण टिनमध्ये ओता.
- केक बेक करण्यासाठी, ओव्हन १८०°C वर १० मिनिटे प्री-हीट करा. त्यानंतर १८०°C वर ३०-४० मिनिटे बेक करा.
ओव्हन नसेल, तर एका मोठ्या पातेल्यात किंवा कुकरमध्ये स्टँड ठेवून मध्यम आचेवर बेक करा. पातेल्याचे झाकण आणि शिट्टी काढून टाका. - केकच्या पिठात गुठळ्या होऊ नयेत म्हणून सर्व कोरडे साहित्य चाळून घाला.
- तुम्ही तूपऐवजी तेल किंवा लोणी देखील वापरू शकता.
- केक बेक झाल्यावर थंड होऊ द्या आणि मग कापून सर्व्ह करा.












