Ganesh Stuti : गणेशाची स्तुती करून करा दिवसाची सुरुवात; अडचणी होतील दूर

गणेशाची स्तुती करून तुम्ही त्यांचा विशेष आशीर्वाद मिळवू शकता. गणेश स्तुती जाणून घेऊया.

हिंदू धर्मात श्रीगणेशाला पूजनीय स्थान आहे. प्रत्येक शुभ कार्यात गणेशाचे पूजन सर्वात आधी केले जाते. गणपतीला अनेक नावाने देखील ओळखले जाते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण प्रथम गणपतीला वंदन करून त्याचे आशीर्वाद घेतो. ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. आज आपण प्राचीन थोर रचनाकारांनी त्यांच्या काव्यात गणेशस्तुती कशी केली आहे, हे पाहूया.

गणेश स्तुतीचे महत्त्व

गणेश स्तुती केल्याने गणपती आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतो. गणपतीचा आशीर्वाद बुद्धी आणि उत्तम आरोग्य देतो. गणपतीच्या कृपेने नवीन सुरुवात साकार होते आणि स्वप्ने पूर्ण होतात. विनायक चतुर्थीसारख्या शुभ दिवशी गणेश स्तुती केल्याने गणपती प्रसन्न होतो आणि शुभ फळे मिळतात. गणपतीच्या पूजेदरम्यान गणेश स्तुती पाठ करणे फायदेशीर ठरते. गणेश स्तुतीचे पठण केले तर जीवनात सुख-समृद्धी येते.

श्री गणेश स्तुति मंत्र

विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय, लम्बोदराय सकलाय जगद्धिताय!
नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय, गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते!!
भक्तार्तिनाशनपराय गनेशाश्वराय, सर्वेश्वराय शुभदाय सुरेश्वराय!
विद्याधराय विकटाय च वामनाय , भक्त प्रसन्नवरदाय नमो नमस्ते!!
नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नम:!
नमस्ते रुद्राय्रुपाय करिरुपाय ते नम:!!
विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारणे!
भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक!!
लम्बोदर नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय!
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा!!
त्वां विघ्नशत्रुदलनेति च सुन्दरेति ,
भक्तप्रियेति सुखदेति फलप्रदेति!
विद्याप्रत्यघहरेति च ये स्तुवन्ति,
तेभ्यो गणेश वरदो भव नित्यमेव!!
गणेशपूजने कर्म यन्न्यूनमधिकं कृतम !
तेन सर्वेण सर्वात्मा प्रसन्नोSस्तु सदा मम !!
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News