Dev Uthani Ekadashi 2025 : एकादशीच्या उपवासानिमित्त घरी बनवा शिंगाड्याचे पिठाचे चविष्ट लाडू, पाहा सोपी रेसिपी

Asavari Khedekar Burumbadkar

उपवासाच्या दिवशी आहारात मोजक्याच पदार्थांचे सेवन केले जाते. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा किंवा वरीच्या तांदळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवून खाल्ली जाते. मात्र नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये शिंगाड्याच्या पिठाचे लाडू बनवू शकता. चला तर जाणून घेऊया लाडू बनवण्याची सोपी रेसिपी…

साहित्य

  • शिंगाड्याचे पीठ
  • तूप
  • पिठीसाखर
  • वेलची पूड
  • खारीक पावडर
  • सुक्या खोबऱ्याची पावडर 

कृती

  • शिंगाड्याच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात शिंगाड्याचे पीठ टाकून मंद आचेवर भाजून घ्या.
  • पीठ सोनेरी रंगाचे झाल्यावर आणि सुगंध सुटेपर्यंत भाजा.
  • आता त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घाला. जर तुम्ही खारीक पावडर किंवा खोबऱ्याची पावडर वापरणार असाल, तर ती देखील आताच घाला.
  • हे मिश्रण व्यवस्थित मिसळा आणि गॅस बंद करा.
  • मिश्रण थोडे कोमट असतानाच त्याचे लहान लाडू वळा.
  • लाडू थंड झाल्यावर एका डब्यात भरून ठेवा. 

ताज्या बातम्या