Shri Swami Samartha Maharaj Aarti : श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती, वाचा…

आरती केल्याने मनाला शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. दररोज आरती केल्याने स्वामी समर्थांची कृपा प्राप्त होते.

हिंदू धर्मात नवग्रहानुसार प्रत्येक वाराला अधिक महत्त्व आहे. गुरुवार म्हटलं की, तो दिवस श्रीविष्णू आणि गुरु माऊली स्वामींसाठी ओळखला जातो. अनेकांच्या मुखात स्वामींच नाव आपल्याला ऐकू येते. दर गुरुवारी अनेक भक्तगण श्रीदत्तगुरु आणि स्वामींची पूजा अर्चना करतात. आजही अनेक घरांमध्ये स्वामींची पूजा, नामस्मरण आणि स्मरण अगदी नित्यनियमाने केले जाते. मठात जाऊन दर गुरुवारी स्वामींचे दर्शनही घेतले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी मनोभावे सेवा करतात. सर्व मठात स्वामींची काकड आरती, सकाळी सायंकाळी आरती होते. वाचा श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती….

आरतीचे महत्व

श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती ‘जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था’ अशी सुरू होते. त्याचे महत्त्व हे आहे की, स्वामी समर्थांची आरती दररोज केल्याने मानसिक शांती मिळते, जीवनात यश येते आणि स्वामी कृपेचा लाभ होतो. गुरुवारी स्वामींची पूजा आणि आरती केल्याने विशेष पुण्य मिळते कारण गुरुवार हा दत्त आणि स्वामींचा वार मानला जातो.

श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !!
जयदेव जयदेव..!!

छेली खेडेग्रामी तू अवतरलासी,
जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी,
म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !!
जयदेव जयदेव..!!

त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार,
याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,
तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !!
जयदेव जयदेव..!!

देवाधिदेव तू स्वामीराया,
निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,
शरणागता तारी तू स्वामीराया !!
जयदेव जयदेव..!!

अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,
किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले,
तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !!
जयदेव जयदेव..!!

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News