Shukra Gochar 2025 : प्रेम, संपत्ती, कीर्ती आणि समृद्धीचा ग्रह म्हणून ओळखला जाणारा शुक्र ग्रह शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७:५० वाजता वृश्चिक राशीतून धनु राशीत संक्रमण करेल. शुक्राच्या या संक्रमणाचा फायदा वृषभ, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना होण्याची शक्यता आहे. या व्यक्तींना प्रेम, संपत्ती आणि आनंदात वाढ अनुभवता येईल.
वृषभ
शुक्र ग्रह गुरु राशीत आणि नंतर धनु राशीत प्रवेश करेल तेव्हा वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात अत्यंत सकारात्मक बदल अनुभवता येतील. या व्यक्तींच्या आर्थिक अडचणी दूर होतील, प्रेम जीवनात त्यांच्या जोडीदारासोबत गोडवा वाढेल. व्यवसायात असलेल्यांसाठी हा काळ फायदेशीर राहील. त्यांना नवनवीन प्रकल्प मिळू शकतात याशिवाय नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनाही नवीन नोकरी मिळू शकते.

तुळ (Shukra Gochar 2025)
तूळ राशीच्या लोकांसाठी, शुक्र राशीचा धनु राशीत प्रवेश खूप फायदेशीर ठरू शकतो. या व्यक्तींच्या घरात कौटुंबिक शांती राहील आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत निर्माण होतील. व्यवसायात नफा वाढू शकतो. प्रेम जीवनातील अडचणी संपू शकतात. आरोग्याच्या अडचणी 20 डिसेंबर पासून दूर होतील. Shukra Gochar 2025
धनू
धनु राशीच्या लोकांसाठी, शुक्राचे भ्रमण अत्यंत शुभ ठरू शकते. या राशींच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अधिक दृढ होतील करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल असेल. तसेच आर्थिक अडचणी कमी होऊ शकतील. तुम्ही काही रखडलेली कामे पूर्ण होतील. वर्षाच्या अखेरीस तुम्हांला एखादी गोड बातमी मिळू शकते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











