श्रावण महिन्यामध्ये या ३ शुभ वस्तू नक्की घरी आणा, महादेवाच्या आशीर्वादाने तुमचे भाग्य चमकेल

Asavari Khedekar Burumbadkar

श्रावण महिना हा भगवान शिवाची पूजा आणि भक्तीसाठी सर्वात पवित्र काळ मानला जातो. दरवर्षी लाखो भाविक या महिन्यात उपवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की श्रावण सुरू होण्यापूर्वी काही खास वस्तू घरी आणल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात? श्रावण महिन्यात भगवान शिव यांना प्रिय असलेल्या गोष्टी घरी आणल्या आणि त्यांची योग्य पूजा केली तर केवळ शिवाचे आशीर्वाद मिळत नाहीत तर घरात सुख, शांती, समृद्धी आणि सौभाग्य देखील राहते. भगवान शंकराच्या आशीर्वादाने भाग्य उजळण्यासाठी, काही शुभ वस्तू घरी आणणे शुभ मानले जाते. चला जाणून घेऊया…

बेलपत्र

बेलपत्र हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे, श्रावण महिन्यात बेलपत्र घरी आणल्यास शंकराची विशेष कृपा प्राप्त होते. 

शुद्ध देशी तुपाचा दिवा

शुद्ध देशी तुपाचा दिवा घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते. श्रावण महिन्यात तुपाचा दिवा लावल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात. तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

धतूरा किंवा भांग

धतूरा आणि भांग ही दोन्ही भगवान शंकराला प्रिय आहेत. श्रावण महिन्यात धतूरा किंवा भांग घरात आणल्याने महादेव प्रसन्न होतात, असे मानले जाते. धतुरा भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. श्रावण महिन्यात धतुरा शिवलिंगावर अर्पण केल्याने सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. भांग देखील भगवान शंकराला अर्पण केली जाते. यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतात आणि मानसिक शांती मिळते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्या