प्राचीन भारतात चाणक्य (Chanakya Niti) हे एक महान विद्वान, राजनीती आणि नीतिशास्त्रातील तज्ञ मानले जातात. ते केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते तर त्यांना जीवन जगण्याचे, नोकरी आणि व्यवसायाचे सखोल ज्ञान होते. आचार्य चाणक्यांनी (Chanakya Niti) आपल्या ‘नीतिशास्त्र’ या ग्रंथामध्ये जीवनातील विविध गोष्टींबाबत सल्ले दिले आहेत. तसेच सुखी आयुष्य जगण्याचे काही कानमंत्र दिले आहेत. त्याचे पालन केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
1) योग्य वेळी योग्य निर्णय घेणे
चाणक्याच्या मते, (Chanakya Niti) ज्याला वेळेचे महत्व समजते, आणि जो वेळेला ओळखतो तोच आयुष्यात पुढे जातो आणि यशस्वी बनतो. जीवन असो नोकरी असो वा व्यवसाय वेळेचा व्यवस्थित वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळेवर निर्णय घेतला तर अनेक चांगल्या गोष्टी होतात .मात्र निर्णय घेताना उशीर केला तर मात्र सगळं उलट लागते. बऱ्याचदा संधी आपल्यासमोर असतात, परंतु वेळेवर निर्णय न घेतल्यामुळे आपण यशापासून दूर जातो. अशावेळी जे वेळेचे महत्त्व सांगतात आणि हिमतीने धाडसी निर्णय घेतात ते आयुष्यात यशस्वी होतात आणि अत्यंत कमी काळात श्रीमंत होतात.

2) तुमची गुपिते कधीही सांगू नका
चाणक्य नीती नुसार (Chanakya Niti) , तुमच्या मनात जे चालू आहे ते इतरांना कधीही सांगू नका .तुमची गुपित, तुमच्या सिक्रेट आणि तुमची रणनीती या नेहमी तुमच्या मनातच ठेवा. कारण एखादी गोष्ट पूर्ण होण्यापूर्वीच जर ती इतरांना सांगितली तर त्यात अडचणी येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि कमी वेळेत श्रीमंत होण्यासाठी तुमचे विचार आणि जीवनातील प्लॅन इतरांना सांगू नका.
3) कामात वाघ व्हा
आचार्य चाणक्यांच्या मते, “ज्ञान आणि शिस्त ही दोन शस्त्रे आहेत जी कोणत्याही व्यक्तीला महान बनवू शकतात. माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल आणि जास्तीत जास्त पैसा कमवायचा असेल तर त्याच्याकडे ज्ञानही असायला हवे आणि आयुष्यातही असायला हवी. व्यवसायात, योग्य माहिती, बाजाराची समज आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन दीर्घकालीन यश सुनिश्चित करतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











