BhauBeej 2025 : दिवाळीत बनवा खास काजू पिस्ता रोल मिठाई, जाणून घ्या रेसिपी!

Asavari Khedekar Burumbadkar

भावाच्या बहिणीच्या नात्यातील प्रेमळ सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला छान छान गिफ्ट देतात. या दिवशी बहीण भावाला छान छान पदार्थ बनवून खाऊ घालते. यंदाच्या भाऊबीजला तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भावाला छान छान गोड पदार्थ बनवून द्या. आज आम्ही तुम्हाला काजू पिस्ता रोल कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत…

साहित्य

  • काजू
  • पिस्ता
  • पिठीसाखर
  • वेलची पावडर
  • मिल्क पावडर

कृती

  • काजू थोडे भाजून घ्या किंवा भिजवून घ्या. नंतर ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  • एका कढईत काजूची पेस्ट आणि पिठीसाखर एकत्र करून मंद आचेवर मंद आचेवर शिजवा. मिश्रण घट्ट होऊ लागेल तेव्हा त्यात वेलची पावडर आणि मिल्क पावडर घालून चांगले मिक्स करा.
  • मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि फॅनखाली अर्धा तास किंवा मिश्रण थंड होईपर्यंत ठेवा.
  • मिश्रण थंड झाल्यावर त्याचे दोन भाग करा. एका भागात पिस्त्याची भरून रोल बनवा.
  • तयार रोल चांदीच्या पानांनी सजवा. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या