Vasu Baras 2025 : वसुबारस का साजरी करावी? जाणून घ्या या दिवशी काय करू नये..

वसुबारस हा दिवाळीचा पहिला सण असतो आणि तो धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो.

हिंदू धर्मात दिवाळी किंवा दीपावली या सणाला सण-उत्सवाचा राजा मानले जाते. प्रत्येकाला दिवाळी या सणाची उत्सुकता असते. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा हा सण प्रत्येकासाठी खास असतो. या सणाची सुरवात वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशीने होते. वसुबारस हा दिवाळीचा पहिला सण असून तो गाई आणि तिच्या वासराचे पूजन करून साजरा केला जातो, कारण गाय ही समृद्धी आणि पोषणाचे प्रतीक मानली जाते. या दिवशी घरातील लक्ष्मीसाठी व कुटुंबाच्या कल्याणासाठी वासरूसहित गाईची पूजा केली जाते आणि या दिवशी तेलात तळलेले पदार्थ खात नाहीत, त्याऐवजी उडदाचे वडे व इतर गोड पदार्थ गाईला खाऊ घातले जातात. या दिवशी काही गोष्टी करणे वर्ज्य मानले आहे. चला तर मग जाणून घेऊ या की या दिवशी काय करू नये…

वसुबारस का साजरी करावी?

वसुबारस सण घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे आणि घरात धनसमृद्धी नांदावी या हेतूने साजरा केला जातो. ‘वसु’ म्हणजे धन आणि ‘बारस’ म्हणजे बारावा दिवस, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.हा सण हिंदू संस्कृतीत गाईंचे महत्त्व अधोरेखित करतो. गायींना समृद्धी आणि पोषणाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी गाईंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.या दिवशी घरातील स्त्रिया कुटुंबाच्या आणि मुलांच्या कल्याणासाठी गाईची पूजा करतात.

या दिवशी काय करू नये?

तेलातले पदार्थ टाळा 

वसुबारसच्या दिवशी तेलात तळलेले पदार्थ खाऊ नये. या दिवशी तेलाप्रमाणेच गाईचे दूध, तूप आणि ताक यांचा वापरही टाळला जातो. 

गाईंना दुखवू नये

या दिवशी गाई आणि वासरांची काळजी घेतली जाते, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास दिला जात नाही.

मांसाहार आणि तामसिक भोजन

या दिवशी मांसाहार किंवा इतर तामसिक अन्न खाणे टाळले जाते. या दिवशी मांस आणि तेलात तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळले जाते.

प्राण्यांना इजा

कुणालाही प्राण्यांना (विशेषतः गायींना) इजा पोहोचवू नका किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. वसुबारसच्या दिवशी प्राण्यांना इजा करू नये, कारण या दिवशी गाईंची पूजा केली जाते आणि त्यांना गोड पदार्थ खाऊ घातले जातात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News