आज तुमचा आमचा आवडता असा दिवाळीचा सण आहे. दिवाळी म्हटलं की, दिव्यांची उजळण आली, फटाक्यांची आतषबाजी आली. अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवणारा हा सण आहे. ज्योतिषशास्त्र नुसार ( Diwali Horoscope) सुद्धा यंदाची दिवाळी विशेष महत्वपूर्ण आहे. या दिवाळीत, गुरू आपल्या उच्च राशी, कर्क राशीत स्थित आहे. सूर्य आणि बुध ग्रह तूळ राशीत बुधादित्य योग निर्माण करत आहेत. सूर्य, मंगळ आणि बुध यांचा त्रिग्रही योग देखील तूळ राशीत असेल. याशिवाय, सर्वार्थ सिद्धी योग आणि महालक्ष्मी राजयोग देखील तयार होत आहेत. हा दुर्मिळ राजयोग तब्बल 71 वर्षानंतर पाहायला मिळतोय. साहजिकच काही राशीना या राजयोगाचा विशेष फायदा होणार आहे.
1) मेष –
महालक्ष्मी राजयोगामुळे मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला काहीतरी मोठे साध्य करण्याचा उत्साह मिळेल. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबात काही चांगली बातमी देखील येऊ शकते. तुमचे आरोग्य उत्तम राहील.

2) मिथुन – Diwali Horoscope
मिथुन राशीच्या व्यक्तींना नशीबाची पूर्ण साथ लाभेल. आर्थिक अडचणी ही दूर होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर गुंतवणूक करण्याच्या विचारात असेल तर हा काळ गुंतवणुकीसाठी अतिशय अनुकूल राहील. दिवाळीनंतर नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. जुने मित्र आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी होऊ शकतात.
3) कर्क –
महालक्ष्मी राजयोगामुळे कर्क राशीच्या लोकांचे प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकेल. तुमचा व्यवसाय भरभराटीला येईल. तुम्ही घर, वाहन किंवा इतर मौल्यवान काम खरेदी करू शकता. घराचे सदस्यांचा मोठा पाठिंबा तुम्हाला मिळेल. Diwali Horoscope
4) कन्या –
सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला असेल. देवी लक्ष्मी तुमच्यावर विशेष कृपा करेल. तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील. आर्थिक बाबी अनुकूल असतील. तुम्ही तुमच्या शत्रूंवर वर्चस्व मात कराल. तुमचे वैवाहिक जीवन आनंददायी असेल.
5) मकर –
मकर राशीच्या लोकांना महालक्ष्मी राजयोगामुळे अनपेक्षित पणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन घर, वाहन, दुकान किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुमची रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगले परतावे मिळतील.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)