शिवलिंग किती प्रकारचे असतात? घरात कोणत्या शिवलिंगाची पूजा करू शकतो? श्रावणापूर्वी जाणून घ्या या महत्त्वपूर्ण गोष्टी…

या लेखात आपण जाणून घेणार आहोत , कोणत्या शिवलिंगाची पूजा करावी आणि कोणत्या शिवलिंगाच्या पुजेमुळे लाभ मिळतो.

श्रावण सुरू होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. अशात भगवान शंकराच्या पुजेची तयारी सुरू झाली आहे. यंदा श्रावण २५ जुलैपासून सुरू होत आहे. या श्रावणात जर तुम्हाला घरात शिवलिंग आणण्याची इच्छा असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. घरात कोणत्या प्रकारचे शिवलिंग आणायला हवेत आणि कोणत्या प्रकाराचं शिवलिंग घरात ठेवण्याच निषिद्ध आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत , कोणत्या शिवलिंगाची पूजा करावी आणि कोणत्या शिवलिंगाच्या पुजेमुळे लाभ मिळतो.

शिवलिंग किती प्रकारचे असतात… (types of Shivlinga)

लिंग पुराणामधील माहितीनुसार, अनेक पदार्थ एकत्र आल्यामुळे शिवलिंगाची निर्मिती झाली आहे. मान्यतेनुसार, याची निर्मिती विश्वकर्मा देवाने केली आहे. तसं पाहता पाच प्रमुख प्रकारचे शिवलिंग असतात.

दगडापासून तयार झालेलं शिवलिंग
रत्नांनी बनवलेले शिवलिंग- रत्नजा शिवलिंग.
धातूचे शिवलिंग- धतुजा शिवलिंग.
लाकडापासून बनवलेले शिवलिंग- दारूजा शिवलिंग.
मातीचे शिवलिंग- मृत्तिका शिवलिंग.

इतर प्रकारातील शिवलिंग…

पारद शिवलिंग…

अत्यंत शक्तिशाली आणि चमकदार पारद शिवलिंग भक्त घरात ठेवू शकतात आणि पुजा करू शकतात. जी व्यक्ती पारद शिवलिंगाची पूजा करते तिच्या जीवनात उन्नती होते आणि शांती-सौभाग्यासह शंकराचा आशीर्वाद राहतो.

स्फटिक शिवलिंग…

स्फटिक शिवलिंग हे स्फटिकापासून बनलेले असते. त्याची पूजा कोणीही करू शकतं. स्फटिक शिवलिंग हे निर्गुण ब्रह्माचे प्रतीक आहे आणि त्याची पूजा केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.

क्रिस्टलचं शिवलिंग…

घरात क्रिस्टलचं शिवलिंगाची पूजा केली जाऊ शकते. या शिवलिंगाची पूजा केल्याने व्यक्तीच इच्छा पूर्ण होते. व्यक्ती आपल्यातील जे गुण वाढवू इच्छित असेल आणि यशस्वी होऊ इच्छित असेल तर क्रिस्टल शिवलिंगाची पूजा-अर्चा करणं फायदेशीर ठरू शकतं.

भस्म शिवलिंग…

हे शिवलिंग घरात ठेऊ नये. भस्म शिवलिंगाची पूजा अघोरी किंवा तंत्र-मंत्राची साधना करणारे करतात. या प्रक्रियेत भस्म शिवलिंगाची पूजा केली जाते. सिद्धी प्राप्त करण्यासाठी अशा शिवलिंगाची पूजा केली जाते.

फुलांचं शिवलिंग…

फुलांपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने पैशाची कमतरता आणि कर्जाचा बोजा दूर होतो. फुलांपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने पैशांशी संबंधित बाबींमध्ये यश मिळते. घरात धनसंपत्ती वाढते.

धान्यापासून तयार केलेलं शिवलिंग…

धान्यापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. गहू, तांदळापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने शंकराची कृपा राहते, त्याच्या आशीर्वादाने संतान दोष नष्ट होतो. मात्र धान्यापासून शिवलिंग तयार करण्यासाठी सर्व धान्य समाज प्रमाणात घ्यायला हवेत.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News