Surya Grahan 2025 : उद्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; कधीपासून सुरू होणार? सुतक काळ कधी?

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण कुठेही असले तरी त्याचा निसर्ग आणि जीवनावर निश्चितच परिणाम होईल. त्यातच महत्वाची बाब म्हणजे हे सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्या दरम्यान होत आहे. त्यामुळे या सूर्यग्रहणाचे महत्त्व आणखी वाढते

उद्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan 2025) असणार आहे. हे एक आंशिक ग्रहण असेल, जे भारतात दिसणार नाही. परंतु, ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण कुठेही असले तरी त्याचा निसर्ग आणि जीवनावर निश्चितच परिणाम होईल. त्यातच महत्वाची बाब म्हणजे हे सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्या दरम्यान होत आहे. त्यामुळे या सूर्यग्रहणाचे महत्त्व आणखी वाढते. उद्याचे हे सूर्यग्रहण किती वाजता सुरू होईल आणि किती वाजता संपेल?? तसेच जगातील कोणकोणत्या देशात सूर्यग्रहण पाहायला मिळेल याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

कधी सुरू होणार सूर्यग्रहण ? Surya Grahan 2025

पंचांगानुसार, या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण उद्या २१ सप्टेंबर २०२५ रोजी, आश्विन अमावस्या रोजी होईल. यादिवशी सर्व पितृ अमावस्या देखील असेल आणि दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्राची सुरुवात होईल. उद्याचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता सुरू होईल आणि पहाटे ३:२३ पर्यंत चालेल.

कधी असेल सुतक काळ??

सूर्यग्रहणाचा (Surya Grahan 2025) सूतक काळ 12 तास आधी सुरु होतो. त्यामुळे भारतीय वेळेनुसार, सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी ग्रहणाचा सूतक काळ सुरु होईल. हे खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे. म्हणजेच काय तर सूर्याचा काही भाग झाकलेला असेल. याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात. हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे याचा सूतक काळ पण भारतात मान्य नसेल.

कोणकोणत्या देशात दिसणार सूर्यग्रहण?

हे सूर्यग्रहण दक्षिण प्रशांत महासागर, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, दक्षिण महासागर, पॉलिनेशिया, मेलानेशिया, नॉरफोक बेट, बेट, क्राइस्टचर्च, वेलिंग्टन आणि न्यूझीलंडमध्ये दिसेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News