आपल्या भारतात वास्तुशास्त्राला (Vastu Tips) मोठं महत्त्व आहे. घराचे काम करताना आणि आतील इंटेरियर करताना आपण ते वास्तू शास्त्रानुसारच कसं करता येईल याकडे लक्ष देत असतो. उद्देश स्पष्ट असतो, की आपल्या वास्तूत कोणताही दोष नसावा आणि आपल्या जीवनात सर्व काही सुरळीत असावे. वास्तुशास्त्रात घराच्या जिन्यालाही विशेष महत्व आहे. घराचा जिना हा फक्त वरच्या खोलीत जाण्यापुरता मर्यादित नसतो, तर त्यातून घराला सकारात्मक ऊर्जा सुद्धा मिळत असते. अशावेळी जिन्यामध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवू नये याची माहिती आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या घरात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.
1) पाण्याशी संबंधित वस्तू
वास्तुशास्त्रानुसार, पाण्याशी संबंधित वस्तू जसे की पाण्याचा जार, मडके, बादली, अशा वस्तू घराच्या पायऱ्यांवर ठेऊ नका. पाणी चंद्र तत्वाशी संबंधित आहे, तर पायऱ्या अग्नि तत्वाशी संबंधित आहेत. या दोघांच्या संयोजनामुळे वास्तु दोष निर्माण होतात, ज्यामुळे मानसिक ताण आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.

2) स्वयंपाकघराशी संबंधित वस्तू (Vastu Tips)
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या पायऱ्यांखाली स्वयंपाकघराशी संबंधित वस्तू जसे की, स्टॉव्ह, गॅस, गॅस सिलेंडर ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात अनावश्यक वाद वाढतो.तसेच यामुळे अग्नि तत्वाचे असंतुलन देखील निर्माण होते, ज्यामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
3) देवघर
जागेच्या कमतरतेमुळे बरेच लोक घराच्या जिन्याखाली मंदिर बांधतात, परंतु वास्तुशास्त्रात (Vastu Tips) हा एक मोठा दोष मानला जातो. पूजास्थळ नेहमीच स्वच्छ, उजेडात असले पाहिजे. पायऱ्यांखाली अंधार असतो आणि कोंदट असे वातावरण राहते जे पूजास्थळासाठी अयोग्य आहे. यामुळे देवाची पूजा व्यर्थ जाते आणि सकारात्मक उर्जेला बाधा येते.
4) शौचालय किंवा बाथरूम
घराच्या जिन्याखाली शौचालय किंवा बाथरूम बांधणे हे खूप वाईट मानले जाते. यामुळे केवळ नकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि करिअरवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











