आपल्या भारतात वास्तुशास्त्राला (Vastu Tips) फार मोठे महत्त्व आहे. नवीन घर बांधताना ते वास्तुशास्त्रानुसारच आहे का हे आधी बघितलं जातं. घराची इंटरियर सुद्धा वास्तुशास्त्रानुसारच बनवले जाते. वास्तुशास्त्र हे फक्त घराच्या रचने पुरते किंवा दारांच्या दिशेपुरते मर्यादित नाही, तर घरात ठेवलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचाही तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. वास्तू शास्त्रानुसार, काही वास्तू तत्वे अवलंबल्याने जीवनातील बहुतेक समस्या दूर होऊ शकतात. आपण आपल्या घराचा हॉल आणि बेडरूम वास्तुशास्त्रानुसार करतो. परंतु घराच्या बाथरूम कडे मात्र अनेकदा आपले दुर्लक्ष होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का?? घराच्या बाथरूम मध्ये काही वस्तू ठेवल्याने तुमच्या घरात नकारात्मक वातावरण येण्याची शक्यता असते. या वस्तू कोणत्या आहेत हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बाथरूममध्ये ठेऊ नका या वस्तू – Vastu Tips
बाथरूम ही आपल्या आंघोळीची जागा असते. वास्तूशास्त्रानुसार, बाथरूम मध्ये तुटलेली काच कधीही ठेवू नये. चुकून जरी तुमच्याकडून बाथरूममधील काच तुटली तर ती लगेचच बाथरूम मधून काढून टाका. कारण ही फुटकी काच तुमच्या घराच्या उर्जेवर नकारात्मक परिणाम करते आणि तुम्हाला पैशाच्या अडचणीला सुद्धा सामोरे जाऊ लागु शकते. याशिवाय खराब झालेली चप्पल बाथरूममध्ये कधीही ठेवू नका. चुकूनही तुटलेली चप्पल बाथरूममध्ये ठेवू नका… असे केल्याने घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. Vastu Tips

आजूबाजूला कोणतेही झाड ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये किंवा बाथरूमच्या बाहेर कोणतेही झाड ठेवू नका. तसेच तुमचे ओले झालेले कपडे सुद्धा बाथरूम मध्ये ठेऊ नका. कारण यामुळे सुद्धा वास्तूदोष होऊ शकतात. याशिवाय जर तुम्ही बाथरूममध्ये वारंवार बादली किंवा टब रिकामा ठेवत असाल तर असे करणे टाळा. असे केल्याने घरात गरिबी येते असे म्हटले जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











