दहशतवाद विरोधी पथकाने कोंढव्यात मोठी छापेमारी केली आहे. कोंढव्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी सुरु असून छापे मारीत दहशतवादी पथकाला अनेक संशयित दहशतवादी हाती लागण्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्रीपासून कोंढव्यात विविध संघटनेच्या कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली आहे. पुणे शहर पोलिसांच्या मदतीने मोठी छापेमारी सुरू आहे, अशी माहिती समोर येत आहे. अनेक गुन्हेगारी कारवाया करणारे गुंड तसेच दहशतवादी या परिसरात आश्रय घेत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत असतात. त्यानंतर आता एटीएसकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे.
पुण्यातील कोंढव्यात एटीएसचे सर्च ऑपरेशन
काल रात्रीपासून पुण्यातील कोंढवा भागात एटीएसचं सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांसह हे संयुक्त सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन सुरू केलं. या सर्च ऑपरेशनदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या कारवाईमुळे पुण्यात तसेच राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिस आणि एटीएसचे जवळपास 350 कर्मचारी पुण्यातील कोंढवा भागात तैनात करण्यात आले आहेत. 25 ठिकाणी पोलिस व एटीएस अधिकाऱ्यांकडून हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. ही मोहीम संशयितांच्या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असण्याची शक्यता आहे, अशी माहितीदेखील समोर येत आहे.
कोंढव्यात अचानक छापेमारी; कारण नेमकं काय?
दोन वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत कोंढवा येथून बंदी असणाऱ्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना अटक केली होती. यानंतर देशातील संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात यश आलं होतं. तर दुसरीकडे सध्या सुरु असणाऱ्या छापेमारीबाबत शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर माहिती देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. देशविरोधी कारवाई होणार असल्याचे इनपुट्स पुणे पोलिस आणि एटीएसला मिळाले होते. त्याच पार्श्वभूमीवर एटीएस अधिकारी आणि पुणे पोलिसांनी कोंढवा भागात ही संयुक्त कारवाई सुरू केली. तसेच हीच कारवाई पिंपरी-चिंचवडमध्ये देखील सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
#WATCH | Pune, Maharashtra: Visuals from the spot where multiple enforcement agencies, including Pune Police, are conducting search operations in Pune’s Kondhwa area to trace suspects allegedly involved in anti-national activities: Pune City Police pic.twitter.com/72SH22Of6D
— ANI (@ANI) October 9, 2025











