MP Breaking News
Sun, Dec 14, 2025

Arjun Rampal Engagement : अर्जुन रामपालच्या आयुष्यात नवा अध्याय; 53व्या वर्षी लॉन्ग टाइम पार्टनरसोबत साखरपुडा

अर्जुन रामपाल आणि ग्रॅब्रिएला डेमेत्रिएड्स गेल्या सहा वर्षांपासून एकत्र आहेत. या नात्यातून त्यांना दोन मुलगे आहेत. पहिल्या मुलाचा जन्म एप्रिल २०१९ मध्ये झाला, तर धाकटा मुलगा आरिवचा जन्म २०२३ मध्ये झाला. विशेष म्हणजे, दोघांनीही आपलं खासगी आयुष्य कायमच प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
Arjun Rampal Engagement : अर्जुन रामपालच्या आयुष्यात नवा अध्याय; 53व्या वर्षी लॉन्ग टाइम पार्टनरसोबत साखरपुडा

Arjun Rampal Engagement : रणवीर सिंह स्टारर ‘धुरंधर’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत असतानाच, या चित्रपटातील खलनायकाने वैयक्तिक आयुष्यातील मोठा निर्णय जाहीर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘धुरंधर’मध्ये मेजर इक्बालची प्रभावी भूमिका साकारणारा अभिनेता अर्जुन रामपाल वयाच्या ५३व्या वर्षी आपल्या दीर्घकाळच्या परदेशी गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, लग्न न करता आधीच दोन मुलांचे पालक असलेला हा कपल आता नव्या आयुष्याच्या टप्प्यात प्रवेश करत आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ने अवघ्या काही आठवड्यांत जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत यंदाच्या अनेक बिग बजेट चित्रपटांना मागे टाकले आहे. चित्रपटाच्या यशासोबतच त्यातील कलाकारही चर्चेत आले आहेत. याचदरम्यान अर्जुन रामपालच्या खासगी आयुष्याबाबत मोठी बातमी समोर आली असून, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

कधी केली घोषणा Arjun Rampal Engagement

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने आपल्या पॉडकास्टचा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएला डेमेत्रिएड्स त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलताना दिसतात. याच संवादादरम्यान अर्जुनने साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली. व्हिडिओ क्लिपमध्ये ग्रॅब्रिएला म्हणते, “आमचं अजून लग्न झालेलं नाही, पण पुढे काय होईल कोण जाणे?” त्यावर अर्जुन स्पष्टपणे सांगतो, “आमचा साखरपुडा झाला आहे आणि याची घोषणा आम्ही तुमच्या शोवर करत आहोत.”

या प्रोमोमध्ये ग्रॅब्रिएल प्रेमाबाबत आपलं मत मांडताना सांगते की, नात्यांमध्ये काही अटी आणि जबाबदाऱ्या असतात. विशेषतः जेव्हा मुलं असतात, तेव्हा अनेक गोष्टी बदलतात आणि निर्णय अधिक विचारपूर्वक घ्यावे लागतात. तिच्या या वक्तव्यामुळे दोघांच्या नात्याची परिपक्वता दिसून येते.

6 वर्षापासून एकत्र

अर्जुन रामपाल आणि ग्रॅब्रिएला डेमेत्रिएड्स गेल्या सहा वर्षांपासून एकत्र आहेत. या नात्यातून त्यांना दोन मुलगे आहेत. पहिल्या मुलाचा जन्म एप्रिल २०१९ मध्ये झाला, तर धाकटा मुलगा आरिवचा जन्म २०२३ मध्ये झाला. विशेष म्हणजे, दोघांनीही आपलं खासगी आयुष्य कायमच प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.Arjun Rampal Engagement

अर्जुन रामपालच्या वैयक्तिक आयुष्याकडे पाहिल्यास, यापूर्वी त्याने मॉडेल मेहर जेसियाशी लग्न केलं होतं. त्या लग्नातून त्याला मायरा आणि माहिका या दोन मुली आहेत. आता अनेक चढ-उतारांनंतर अर्जुनने पुन्हा एकदा आयुष्यात नव्या नात्याला अधिकृत मान्यता दिली असून, त्याच्या चाहत्यांकडून त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘धुरंधर’च्या यशाच्या लाटेत अर्जुन रामपालची ही वैयक्तिक घोषणा बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरली असून, अभिनेता पुन्हा एकदा प्रोफेशनलसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही प्रकाशझोतात आला आहे.