सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘Bigg Boss 19 सध्या प्रचंड चर्चेत आहे. नेहल आणि बसीर यांच्या एव्हिक्शननंतर या आठवड्यात स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे घरातून बाहेर झाले आहेत. मात्र, त्यांचा हा एव्हिक्शन प्रेक्षकांसाठी मोठा धक्का ठरला आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या जाण्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.
प्रणितला डेंग्यूची लागण ( Bigg Boss 19)
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणित यांना प्रत्यक्षात बाहेर काढण्यात आलेले नाही, तर त्यांच्या आरोग्याच्या कारणामुळे शोमधून तात्पुरते बाहेर करण्यात आले आहे. शोच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, प्रणितची तब्येत काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यांना *डेंगू*ची लागण झाली असून, सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.

‘इंडियन एक्स्प्रेस’ला मिळालेल्या माहितीनुसार, प्रणित यांचा एव्हिक्शन तात्पुरता असू शकतो. ते बरे झाल्यानंतर ‘सीक्रेट रूम’मध्ये परत प्रवेश करू शकतात. मात्र, याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यांच्या आरोग्याची स्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात येत आहे. प्रणितचा एव्हिक्शन या आठवड्यात घराचा कॅप्टन ठरल्याच्या काही तासांनंतरच झाला. त्यामुळे घरातील सदस्यांनाही हा निर्णय धक्कादायक वाटला. (Bigg Boss 19)
अधिकृत निवेदन जारी
दरम्यान, प्रणित मोरे यांच्या टीमने त्यांच्या आरोग्याबद्दल अधिकृत निवेदन जारी केले आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत टीमने लिहिले आहे की, “प्रणित आता स्थिर आहेत आणि ‘बिग बॉस’च्या टीमशी सातत्याने संपर्कात आहेत. त्यांना योग्य उपचार दिले जात आहेत. चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेम आणि प्रार्थनांसाठी आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.”
गेल्या आठवड्यात अशनूर आणि अभिषेक यांच्या चुकीमुळे संपूर्ण घर नॉमिनेट झाले होते. दोघे वारंवार माईकशिवाय बोलताना आढळल्याने बिग बॉसनं घरातील सदस्यांना शिक्षा म्हणून सर्वांना नॉमिनेट केलं होतं. परिणामी, या आठवड्यात प्रणित मोरे घराबाहेर झाले, मात्र त्यांच्या पुनरागमनाची शक्यता अद्याप कायम आहे. आता प्रेक्षकांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे की, प्रणित खरोखरच परत येणार का आणि ते ‘सीक्रेट रूम’मध्ये कोणत्या नव्या ट्विस्टसह प्रवेश करणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.











