साउथ सुपरस्टार ऋषभ शेट्टी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ‘कांतारा’ च्या प्रीक्वलसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कांतारा: अध्याय 1’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली असून, तो येत्या 2 ऑक्टोबर 2025 रोजी, गांधी जयंतीच्या दिवशी, देशभरातील सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. (Kantara Chapter 1 Release Date) ऋषभ शेट्टीने स्वतःच या प्रोजेक्टची घोषणा करत रिलीज डेट उघड केली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
चित्रपटाची पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्ये – Kantara Chapter 1 Release Date
‘कांतारा: अध्याय 1’ हा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ चित्रपटाचा प्रीक्वल आहे.

हा चित्रपट दैव कोला या पारंपरिक धार्मिक कलेच्या उगमावर आधारित असून, कदंब राजवटीच्या काळात घडणारी कथा मांडतो.
या चित्रपटात प्राचीनतेचा भव्य अनुभव देण्यासाठी मोठ्या प्रमाणात VFX वापरण्यात येणार असून, ‘The Mill’ आणि ‘MPC’ या हॉलिवूडमधील नामवंत स्टुडिओज काम करत आहेत.
The Expendables’ आणि ‘Hercules’ सारख्या चित्रपटांवर काम केलेले अॅक्शन डायरेक्टर्सही या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाले आहेत.
चित्रपटाचा अंदाजे बजेट जवळपास 125 कोटी रुपये आहे.
चित्रपटाची शूटिंग आणि अॅक्शन सीन्स
चित्रपटाच्या शूटिंगसाठी कुंदापूर येथे भव्य सेट उभारण्यात आले आहेत. येथे 60 दिवस विशेष अॅक्शन सीन्सचे चित्रीकरण सुरू असून, ते RRR चे अॅक्शन डायरेक्टर टोडोर लजारोव यांच्या देखरेखीखाली होत आहे. त्यानंतर गाण्यांच्या चित्रीकरणास सुरुवात होईल. Kantara Chapter 1 Release Date
कोणकोणत्या भाषेत प्रदर्शित होणार
हा भव्य चित्रपट कन्नड, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी या सात भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे, ज्यामुळे त्याचा प्रभाव अधिक व्यापक असणार आहे.
दमदार कलाकार –
ऋषभ शेट्टी – मुख्य भूमिकेत, लेखक व दिग्दर्शक
जयराम – प्रमुख भूमिका
रुक्मिणी वसंत – ‘कणकवती’ या पात्रात
गुलशन देवैया – ‘कुलशेखर’ या भूमिकेत
‘कांतारा’ ने 2022 मध्ये सुमारे 350 कोटींची कमाई करत संपूर्ण भारतात एक इतिहास घडवला होता. आता प्रीक्वल ‘Kantara Chapter 1’ कडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. ट्रेलरची वाट पाहणं आता सुरु झालं असून, 2 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळेल.











