‘स्त्री २’ नंतर मॅडॉक फिल्म्स पुन्हा एकदा हॉरर-कॉमेडीचा धमाका घेऊन येत आहे. त्यांची आगामी फिल्म ‘थामा’ या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच त्यातील गाण्यांनी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला नोरा फतेहीचा (Nora Fatehi Thama Song) आयटम साँग ‘दिलबर की आंखों का’ हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, अवघ्या ४ मिनिटांत १ मिलियन आणि एका तासात तब्बल २ मिलियन व्ह्यूज मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
नोराच्या आकर्षक अदा Nora Fatehi Thama Song
‘कमरिया’ गाण्यातील धमाकेदार परफॉर्मन्सनंतर नोरा फतेहीने ‘थामा’मधील नव्या गाण्यातही आपली जादू दाखवली आहे. रेट्रो आणि मॉडर्न शैलीचा सुरेख संगम असलेल्या या गाण्यात नोराचा डान्स पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या आकर्षक अदा आणि एनर्जेटिक डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. Nora Fatehi Thama Song

‘थामा’ ही मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील पाचवी फिल्म असून, या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. चित्रपटाचं लेखन नीरेन भट्ट, सुरेश मैथ्यू आणि अरुण फलारा यांनी केलं आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांच्यासह फैजल मलिक, गीता अग्रवाल, संजय दत्त, डायना पेंटी आणि विजय राज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. याशिवाय वरुण धवन एक खास कैमियो करताना ‘भास्कर/भेड़िया’च्या भूमिकेत झळकणार आहेत. Nora Fatehi Thama Song
थामाची उत्सुकता आणखी वाढली
याआधी रश्मिका मंदानाचं रोमँटिक गाणं ‘तुम मेरे ना हुए’ हेही प्रेक्षकांनी भरभरून पाहिलं होतं. आता नोरा फतेहीच्या धमाकेदार आयटम साँगमुळे ‘थामा’ चित्रपटाविषयी उत्सुकता आणखीनच वाढली आहे. चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असून, हॉरर आणि कॉमेडीचा भन्नाट अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.











