Rakhi Sawant On Dharmendra Death : धर्मेंद्रचं निधन 2 दिवस आधीच झालं होतं; नव्या दाव्याने खळबळ

धर्मेंद्र यांचे निधन दोन दिवसांपूर्वी झाले होते. मला अनेकांनी सांगितले. मला स्वप्नात ते स्वतः आले होते. तेथील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही सांगितले होते.

Rakhi Sawant On Dharmendra Death : बॉलिवूडच्या सुवर्णकाळात स्वतःची स्वतंत्र छाप सोडणारे आणि ‘हीमॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. निधनानंतर लगेचच अभिनेते धर्मेंद्र यांचे घाईघाईत अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र आता बॉलीवूडमधूनच धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल अत्यंत धक्कादायक असा दावा करण्यात आला आहे. धर्मेंद्र यांचं निधन 2 दिवसात पूर्वीच झालं होतं असा खळबळजनक दावा अभिनेत्री राखी सावंत हिने केला आहे.

काय म्हणाली राखी सावंत (Rakhi Sawant On Dharmendra Death)

एका पत्रकार परिषदेत बोलताना राखी सावंत म्हणाली धर्मेंद्र यांचे निधन दोन दिवसांपूर्वी झाले होते. मला अनेकांनी सांगितले. मला स्वप्नात ते स्वतः आले होते. तेथील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही सांगितले होते. मला खूप दुःख झाले की त्यांच्या फॅन्सना त्यांना भेटू दिले गेले नाही. धर्मेंद्र यांना ज्या सन्मानासह निरोप द्यायला हवा होता तसा देओल कुटुंबीयांनी दिला नाही. ते फक्त देओल कुटुंबाचे भाग नव्हते. मान्य आहे ते तुमचे वडील होते, आम्ही याचा आदर करतो पण ते तुमचे वडील होण्यापूर्वी ते देशाचे हिरो होते, आमचे हिरो होते असे राखी म्हणाली. Rakhi Sawant On Dharmendra Death

धर्मेंद्र यांच्या निधनामुळे राखीने वाढदिवस केला पोस्टपोन

या प्रेस कॉन्फरन्समध्ये राखीने आपल्या वाढदिवसाबाबत बोलताना सांगितले की माझा वाढदिवसही २५ नोव्हेंबरला होता आणि पार्टीची पूर्ण तयारी झाली होती. पण निधनाची बातमी कळताच आम्ही वाढदिवसाची पार्टी रद्द केली.

दरम्यान, धर्मेंद्र हे गेल्या सहा दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ होते. शोलायपासून सीतानं, प्रतिज्ञा, धर्मवीर, चुपके चुपके यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. अॅक्शन, रोमॅन्स, कॉमेडी अशा प्रत्येक शैलीत त्यांनी आपली छाप पाडली. त्यांच्या निधनानंतर उद्योगातील अनेक कलाकारांनीही त्यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या असून त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेमातील एक महत्वाचे पर्व संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News