Red Soil Stories : ‘शेवटच्या श्वासापर्यंत तुझा…’ शिरीषच्या निधनानंतर पहिल्यांदाच पूजाने मन केलं मोकळं

Pooja social media post after shirish death : शिरीषच्या निधनानंतर पहिल्यांदाच पूजाने आपल्या युट्यूब चॅनलवरुन पोस्ट शेअर केली आहे.

Red Soil Stories Shirish Gawas : रेड सॉइल स्टोरीज (Red Soil Stories YouTube channel) या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातील खाद्यसंस्कृती केवळ देशभरात नाही तर जगभरात पोहोचवणाऱ्या जोडप्याच्या आयुष्यात एका महिन्यापूर्वी मोठा आघात घडला. २ जुलै २०२५ रोजी शिरीष गवस या तरुणाचं वयाच्या ३३ व्या वर्षी निधन झालं. शिरीषला जुलै महिन्यात ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. यानंतर त्याला गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र २ ऑगस्ट रोजी त्याचं निधन झालं.

वर्षभरापूर्वी त्यांच्या घरात पाळणा हलला होता. शिरीषच्या ( Shirish Gawas death) निधनाच्या एक महिन्यापूर्वी त्यांची लेक श्रीजाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. याचे व्हिडिओही त्यांनी आपल्या युट्यूब अकाऊंटवरुन शेअर केले होते.

दरम्यान शिरीषच्या निधनानंतर पहिल्यांदाच पूजाने आपल्या युट्यूब चॅनलवरुन पोस्ट शेअर केली आहे.

शिरीषसाठी पूजाची भावनिक पोस्ट.. (Pooja social media post after shirish death)

प्रिय शिरीष
तू नाहीस हे अजूनही मन मानत नाही. तुझ्या जाण्याच्या बरोबर एक महिना आधी आपण मुंबईहून गावी येण्यासाठी प्रवास करत होतो. प्रवासात पूर्ण वेळ आता पुढचे शूट्स, त्याचे shot division, शूट prep यावरच चर्चा सुरू होती आपली.. आपल्याला कुठे माहित होत की नियतीने आपल्यासाठी वेगळंच प्लॅनिंग करून ठेवले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तुझा Red Soil Stories च्या कामासाठीचा ध्यास मी खूप जवळून पाहिला आहे…तू शरीराने माझ्याजवळ नसलास तरी तुझ्या गोड आठवणी आणि तुझ्यासारखी सेम दिसणारी श्रीजा… आपल्या प्रेमाचं प्रतीक माझ्याजवळ ठेवा म्हणून आहे. शेवटपर्यंत मन भरून जगलास. प्रत्येकाला आपलस केलस. एखादा माणूस अजातशत्रू कसा असू शकतो याच जिवंत उदाहरण तु होतास. खूप कमी जगलास पण एवढ्या कमी कालावधीत तुझ्या कामाने जी लोकप्रियता तू मिळवलीस ती असामान्य आहे. तुझं काम येणाऱ्या पिढीला कायम प्रेरणा देईल. माझ्या आयुष्यातली तुझी पोकळी कधीच भरून निघू शकत नाही, पण तुझ्यासोबतची 13 वर्ष 9 महिने आता आयुष्यभर माझी साथ देतील. तू सोबत आहेसच. कायम पाठीशी राह. जिथे आहेस तिथे सुखात राह. माझी खात्री आहे तिथे सुद्धा देवाला आणि सगळ्याना आपलस करशील.
तुझी चिऊ.

shirish
प्रेक्षकांचे मानले आभार…

रेड सॉइल स्टोरीज हे शिरीषचं स्वप्न होतं. यासाठी तो खूप मेहनत घेत होता. आपल्या व्हिडिओमधून त्याने कोकणातलं विश्व प्रेक्षकांसमोर खुलं केलं होतं. खाद्यसंस्कृतीच्या निमित्ताने तो कोकणातले अनेक पैलू उलगडत होता. लोकांनाही त्यांचे व्हिडिओ आवडत होते. शिरीषच्या निधनानंतरही पूजाने त्याचं काम अधिक मोठं करावं अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही प्रेक्षकांकडून येत होत्या. तिच्या कठीण काळात सर्व प्रेक्षक पूजाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले होते.

याबाबत पूजाने पोस्टमध्ये म्हटलं, या कठीण काळात आपण सर्वांनी Red Soil Stories चे परिवार या नात्याने खूप खंबीर आधार, प्रेम दिलत. खूप जणांनी त्यांचे दुःख आणि सांत्वन मेसेजेस, पत्र तसेच प्रत्यक्ष भेटून व्यक्त केले.या दुःखातून सावरण्यासाठी आपण दाखवलेल्या या प्रेमासाठी मी आणि संपूर्ण गवस परिवार कायम आपला ऋणी राहील. इथून पुढेही असेच प्रेम करत राह. आशीर्वाद असू द्या.


About Author

Smita Gangurde

Other Latest News