२००३ मध्ये प्रदर्शित झालेला सलमान खानचा सुपरहिट आणि हृदयस्पर्शी चित्रपट ‘तेरे नाम’ आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तब्बल २२ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल (Tere Naam Movie Sequel) म्हणजेच दुसरा भाग येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. त्या काळात सलमान खानच्या अभिनयाने आणि त्याच्या ‘राधे’ या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या भूमिकेमुळे सलमानच्या करिअरमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. आता त्याच भूमिकेत तो पुन्हा दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियाडवाला ‘तेरे नाम 2’ या प्रकल्पावर काम करण्याच्या तयारीत आहेत. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन दिवंगत सतीश कौशिक यांनी केले होते. या चित्रपटाचा सिक्वेल करण्याचा विचार प्रथम २०२० साली पुढे आला होता. परंतु आता या कल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्तरूप देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. साजिद नाडियाडवाला सध्या या चित्रपटाचे राइट्स मिळवण्यासाठी मूळ निर्माता सुनील मनचंदा आणि मुकेश तलरेजा यांच्याशी चर्चा करत आहेत.

सलमान खान पुन्हा राधेच्या भूमिकेत? Tere Naam Movie Sequel
या चित्रपटात पुन्हा एकदा सलमान खानला राधेच्या मुख्य भूमिकेत पाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका विश्वसनीय स्रोताच्या माहितीनुसार, कायदेशीर व आर्थिक बाबी पूर्ण झाल्यानंतर सलमान खानची निवड अधिकृतपणे घोषित केली जाईल. सध्या या प्रकल्पासाठी प्राथमिक स्क्रिप्टवर काम सुरू असून, सलमान खानची भूमिका निश्चित झाल्यानंतर दिग्दर्शकाची अधिकृत घोषणा देखील केली जाईल. Tere Naam Movie Sequel
तेरे नाम ने किती कमाई केली होती ?
तेरे नाम’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २००३ रोजी प्रदर्शित झाला होता. *BoxOfficeIndia.com नुसार, या चित्रपटाचे बजेट सुमारे १० कोटी रुपये होते. तर या चित्रपटाने भारतात ₹२२.५३ कोटींची कमाई केली होती. भावनिक प्रेमकथा आणि संगीतामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आजही ताजा आहे. IMDb वर या चित्रपटाला ७.२ ची चांगली रेटिंग मिळाली आहे. हा चित्रपट सध्या ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री भूमिका चावला झळकली होती. मात्र, ती या सिक्वेलमध्ये परतणार का याबाबत अजून कोणतीही माहिती अधिकृतपणे समोर आलेली नाही. ‘तेरे नाम 2’ या प्रस्तावित चित्रपटामुळे सलमानचे चाहते मात्र उत्साहात आहेत.











