Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, काही तासांत मिळणार 1500 रुपये; आदिती तटकरेंची मोठी घोषणा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे

महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता उद्या म्हणजेच 10 ऑक्टोंबरला पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. खरंतर दिवाळी अगदी तोंडावर आली असताना लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे राज्यातील महिला वर्गाचे लक्ष लागलं होतं. अखेर आदिती तटकरेंनी याबाबतची घोषणा करत महिलांना मोठा दिलासा दिला आहे. आदिती तटकरे यांच्या या घोषणेमुळे राज्यातील लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार आहे.

काय म्हणाल्या आदिती तटकरे? Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं.

2 महिन्यात E-KYC करा

आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून  https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असं आदित तटकरे यांनी म्हटलं.

महिला व बालविकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक वेबसाईट बनवली आहे. त्या वेबसाईटवर लाभार्थी महिलेने ई केवायसी पूर्ण करणं गरजेचे आहे.  https://ladakibahin.maharashtra.gov.in ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे. महिलांनी या वेबसाईटशिवाय दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवर माहिती शेअर करु नये


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News