मुंबईत मेट्रो सेवेचं जाळं दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसादही उल्लेखनीयरीत्या वाढला आहे. एकेकाळी फक्त काही मार्गांवर मर्यादित असलेली मेट्रो सेवा आता शहराच्या विविध भागांपर्यंत पोहोचत आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर सोयी, वेळेची बचत आणि ट्रॅफिकच्या समस्येतून दिलासा मिळत आहे. नवीन सुरू झालेल्या मेट्रो मार्गांमुळे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण दिशेतील प्रवास अधिक सुलभ झाला आहे. विशेषतः कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवासी यांना मेट्रो ही जलद, सुरक्षित आणि आरामदायी वाहतूक सुविधा ठरते आहे. अशा परिस्थितीत लवकरच मेट्रो २ ब मार्गिका प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार आहे.
‘मेट्रो २ ब’ लवकरच सेवेत
मंडाळा-चेंबूर मार्गावर धावणारी ही ‘मेट्रो दोन ब’ आहे. ही उन्नत मार्गिका मंडाळा ते ईएसआयसीनगर (अंधेरी प.) या मार्गावर धावेल. मंडाळा ते डायमंड गार्डन, चेंबूर असा या मार्गिकेचा पहिला टप्पा प्रस्तावित आहे. या पहिल्या टप्प्यातील सुरक्षा प्रमाणपत्र, त्यासंबंधी विविध परीक्षणं, तपासण्या पूर्ण झाल्या. तपासण्या पूर्ण झाल्यानंतर 15 दिवस आधीच मेट्रोसाठी प्रमाणपत्रही मिळालं आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएला हे सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं आहे.बईत आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार होता. त्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. मात्र कामं पूर्ण न झाल्याने ते उद्घाटन हुकलं. पूर्व उपनगरात राहणाऱ्या मुंबईकरांचे डोळे मंडाळा-चेंबूर मेट्रोकडे लागले आहेत. पण आता ही मेट्रो सुरू होण्यासाठी, प्रत्यक्षात सेवेत दाखल होण्यासाठी नागरिकांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. या मेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं आहे, काही स्टेशन्सची कामे लांबणीवर पडल्याने अद्याप या सेवेचं उद्घाटन झालेलं नाही.

मुंबईत मेट्रोला मोठा प्रतिसाद
मुंबई मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक तिकिट प्रणाली, डिजिटल कार्ड आणि स्वच्छतेवर भर दिला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या आणि वाहनांच्या तुलनेत मेट्रो हा पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम पर्याय म्हणून उदयास येत आहे. या सेवेच्या विस्तारामुळे केवळ प्रवाशांना फायदा होत नाही, तर शहरातील वाहतूक व्यवस्थेवरील ताणही कमी होत आहे. आगामी काळात मुंबई मेट्रोचं जाळं अजून विस्तारित होऊन संपूर्ण महानगराला जोडण्याची योजना असून, त्यामुळे मुंबईच्या वाहतूक इतिहासात मेट्रो एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. मुंबईत मेट्रोल सेवेला भरभक्कम अशा स्वरूपाचा प्रतिसाद खरंतर मिळताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत यामध्ये नेमक्या काय सुधारणा होतात, आणि कोणते नवे प्रकल्प येतात, ते पाहणे महत्वाचं ठरणार आहे.











