शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणसाठी केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून अल्प भूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये देण्यात येतात. २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातुन २० हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. आता 21 वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे, 21 व्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.
कधी मिळणार 21 वा हप्ता (PM Kisan Yojana)
खरं तर पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 21 वा हप्ता दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी चर्चा सुरू होती. परंतु आता हाच हप्ता दिवाळीनंतर शेतकऱ्यांना मिळू शकतो. एका दाव्यानुसार, एक नोव्हेंबर रोजी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. सरकारकडून मात्र याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

उत्तर भारतात हप्ता जमा
उत्तर भारतात या राज्यांमध्ये मोठी अतिवृष्टी झाली होती त्या पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 वा हप्ता आधीच जमा केला आहे. या राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. अतिवृष्टी, महापूर आणि जमीन खचल्याने या राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट बँक खात्यात जमा केली आहे. महाराष्ट्रात मात्र अशा प्रकारची कोणतीही मदत झाली नाही.
पीएम किसान योजनेत बदल
यापूर्वी जर पती आणि पत्नी या दोघांच्याही नावावर जमीन असेल तर दोघानाही पीएम किसान योजनेचे पैसे मिळत होते. मात्र आता नव्या नियमानुसार, पती आणि पत्नीच्या नावावर शेती असेल तर केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी पतीला पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) पैसे मिळणार नाहीत. राज्यातील अशा ६० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला आहे.











