iPhone 17 : हलका आणि स्लीम आयफोन 17 ची नवी सीरिज उद्या होणार लाँच, यावर्षीही फोल्डेबल फोन नाही!

यावेळी अॅपलच्या नव्या फोनच्या लाँच कार्यक्रमाला ऑव ड्रॉपिंग असं नाव देण्यात आलंय. याचा अर्थ लोकांना आश्चर्यचकित करणारा असा काढण्यात येतो.

मुंबई- अॅपल उद्या होणाऱ्या ऑव ड्रॉपिंगमध्ये आयफोन 17 ची नवी सीरिज उद्या प्रदर्शित करणार आहे. गेल्या काही वर्षांत अॅपलच्या प्रोडक्ट्समध्ये नवे विस्मयकारक बदल बघण्यात आलेले नाहीत. याहीवेळी थोड्या फार फरकानं अॅपल नव्या सीरिजला समोर आणेल असं सांगण्यात येतंय.

अनेकांचं असं म्हणणं आहे की, 2011 साली अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्सच्या निधनानंतर अॅपलमध्ये मोठे नवे बदल पाहायला मिळालेले नाहीत. दुसरीकडे सॅमसंगसारखअया कंपन्या फोल्डेबल फोन, एआय आणि नव्या हार्डवेअरच्या साथीनं गतीनं पुढं जाताना दिसतायेत.

ऑव ड्रॉपिंगमध्ये काय होणार?

यावेळी अॅपलच्या नव्या फोनच्या लाँच कार्यक्रमाला ऑव ड्रॉपिंग असं नाव देण्यात आलंय. याचा अर्थ लोकांना आश्चर्यचकित करणारा असा काढण्यात येतो. या इव्हेंटमध्ये अॅपल कंपनी आयफोन 17 चे चार मॉडेल्स रीलिज करणार आहेत. त्यात आयफोन 17, आयफोन 17 एयर, आयफोन 17 प्रोचं सादरीकरण होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच अॅपल वॉच सीरिज 11लाही लाँच करण्यात येईल अशी शक्यता आहे. आयओएस 26 ही सादर करण्यात येईल अशी शक्यता आहे. ज्यात लिक्विड ग्लास इंटरफेस असेल.

लाँच इव्हेंटमध्ये काय होणार?

स्लीम फोन – आयफोन 17 एयर लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे. हा अॅपलचा सर्वात स्लीम फोन असेल. हा लाँच झाल्यास आयफोन एक्सनंतरचं हे नवं डिझाईन असेल.

सेल्फी कॅमेरा- यावेळी सगळ्या मॉडेल्समध्ये 24 एमपी सेल्फी कॅमेरा असेल. यापूर्वी हा कॅमेरा केवळ 12 एमपी होता. प्रो मॉडेल्समध्ये पहिल्यांदाच 8 के व्हिडीओ रेकॉर्डिंग देण्यात येईल अशी चर्चा आहे.

पॉवर बॅकअप- आयफोन 17 आणि प्रो मॅक्समध्ये 5000 एमएएच पेक्षाही जास्त क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे.

एआय फिचर्स – आयफोन 17 मध्ये अॅपल इंटिलेजन्ससोबत अपडेटेड सीरि, एआय बेस्ड फोटो, व्हिडीओ एडिटिंग, ऑटोमेटिक टेक्स्ट समरी आणि जेनमोजीसारखे फिचर्स मिळण्याचीही शक्यता आहे.

किंमत – भारतात स्ँटडर्ड आयफोन 17 ची किंमत 79 हजारांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. प्रो मॅक्स मॉडेलची किंमत 1 लाख 64 हजार 900 रुपयांपर्यंत असेल.


About Author

Smita Gangurde

Other Latest News