Bhendi Bhaji health : भेंडी ही तशी बहुतांश जणांच्या आवडीची भाजी. चांगल्या पद्धतीने केली तर न आवडणारेही आवडीने खातील. भेंडी चवदार तर असतेच त्याशिवाय आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन के आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्व आढळून येतात. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. भेंडी जितकी चांगली तितकीच नुकसादायी पण ठरू शकते. चुकीच्या पद्धतीने भेंडीचं सेवन केल्याने शरीराला नुकसान पोहोचू शकतं.
भेंडी खाण्याचे नुकसान…
पचन – भेंडीमध्ये विरघळणारे फायबर भरपूर असतात. गरजेपेक्षा जास्त सेवन केल्याने पोटाशी संबंधित त्रास गॅस, पोट फुगणे आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना गॅस, अॅसिडिटीचा त्रास असेल त्यांनी भेंडीचं सेवन कमी प्रमाणात करा.

किडणी – शरीरातील ऑक्सालेट शरीरात कॅल्शियमसोबत मिळून ऑक्सालेट क्रिस्टल बनू शकतं, ज्यामुळे किडणी स्टोनच्या समस्येचं कारण ठरू शकतं. ज्यांना किडणीमध्ये स्टोनचा त्रास असेल त्यांनी भेंडीपासून दूर राहावं.
कोलेस्ट्रॉल – भेंडी खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रेरॉलचं प्रमाण वाढू शकतं. जे शरीरासाठी चांगलं नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त याच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. जे हृदयाच्या रुग्णांसाठी नुकसानदायक होऊ शकतं.
एलर्जी – भेंडीमध्ये काही घटकांमुळे त्वचेवर खाज, सूज किंवा श्वास घ्यायला त्रास जाणवू लागतो. त्यामुळे अशांनी भेंडी खाणं टाळावं, किंवा केव्हा तरीच भेंडी कमी प्रमाणात खावी.
हेल्दी पद्धतीने भेंडी कशी कराल?
कुठलीही भाजी हेल्दी पद्धतीने करायची म्हणजे त्यात कमी तेल वापरावं. भेंडी आधीच स्वच्छ धुवून चिरुन ठेवावी. भेंडी कोरडी असेल तर चिकट होत नाही. शिवाय कांदा लसूण व्यवस्थित घालावा. फार मसालेदार करण्याऐवजी कांदा, मिरची, लसूण, धणे पूड आणि कोकम घालून भेंडी करावी. शिवाय भेंडी फार शिजवू नये. भाजी हिरवी राहायला हवी याकडे लक्ष द्या.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











