Diwali Abhyanga Snan Benefits: दिवाळीचा सण हा केवळ रोषणाई आणि फराळाचा नसून आध्यात्मिक आणि शारीरिक शुद्धीकरणाचा देखील आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशी छोटी दिवाळी आहे, ज्याला नरक चतुर्दशी असेही म्हणतात आणि त्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी लवकर केले जाणारे अभ्यंग स्नान हे केवळ एक धार्मिक विधी नाही तर आयुर्वेदात वर्णन केलेली एक महत्वाची आरोग्य विधीसुद्धा आहे.
आयुर्वेदात, अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीरावर तेलाने मालिश करणे. त्यामुळे केवळ त्वचाच उजळते असे नाही तर रक्ताभिसरण सुधारते, झोप सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात. दिवाळीला केले जाणारे हे स्नान हिवाळ्याच्या सुरुवातीला शरीराला आतून बळकट करणारे एक डिटॉक्स प्रक्रिया आहे. या लेखात, आपण दिवाळीला अभ्यंग स्नान कसे करावे आणि त्याचे फायदे काय आहेत याबाबत जाणून घेऊया…..

अभ्यंग स्नान करण्याची योग्य पद्धत-
आयुर्वेदानुसार, सूर्योदयापूर्वी म्हणजेच सकाळी ४.३० ते ६ दरम्यान अभ्यंग स्नान करणे चांगले असते आणि त्यासाठी तिळाचे तेल हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. कारण ते वात दोष संतुलित करते. तेल थोडे गरम करा, कारण कोमट तेल त्वचेद्वारे अधिक सहजपणे शोषले जाते. ते तुमच्या तळहातावर घाला आणि तुमच्या संपूर्ण शरीरावर हलक्या हाताने मालिश करा.
अभ्यंगाची सुरुवात नेहमी तुमच्या डोक्याने करा. त्यानंतर मान, खांदे, पाठ, हात आणि सर्वात शेवटी पायावर तेलाने मालिश करायची. डोक्याला मालिश केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि झोप सुधारते. मालिश करताना एखादा आवडीचा मंत्रसुद्धा म्हणायचा. तेल तुमच्या शरीरावर १०-१५ मिनिटे राहू द्या जेणेकरून ते त्वचेत प्रवेश करेल.
दिवाळीला अभ्यंग स्नान करण्याचे फायदे-
वातदोष संतुलित करते-
तीळ किंवा मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने शरीरातील वातदोष संतुलित होतो, ज्यामुळे सांधेदुखी, त्वचेचा कोरडेपणा आणि थकवा यापासून आराम मिळतो.
त्वचेची आर्द्रता आणि तेज-
नियमित अभ्यंग त्वचेची नैसर्गिक आर्द्रता राखण्यास आणि आतून पोषण करण्यास मदत करते.
रक्ताभिसरण सुधारते-
तेलाची मालिश रक्तवाहिन्या सक्रिय करते आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारते.
स्नायू आणि हाडे मजबूत करणे-
अभ्यंग स्नायूंना बळकटी देते आणि हाडे मजबूत करते. हे विशेषतः वृद्धांसाठी फायदेशीर आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











