Tea Making : चहामध्ये आधी काय घालावं, साखर की दूध? 90% लोक चुकीच्या पद्धतीने बनवतात, जाणून घ्या योग्य पद्धत

चहा आरोग्यासाठी फार चांगला नसतो हे अनेकांना माहिती आहे. मात्र चहा बनविण्याच्या पद्धतीवर सर्व अवलंबून असतं. चहा पावडर, साखर आणि दूध घालण्याची योग्य पद्धत चहा किती चांगला हे ठरवतो.

Does milk or sugar go first in tea : सकाळी उठताच कोणत्या गोष्टीची तलफ लागते तर ती चहाची. आलं घातलेल्या कडक चहाचे घोट घेणं म्हणजे स्वर्गसुख. अनेकांना चहा घेतल्याशिवाय ताजंतवानं वाटत नाही. सकाळचा चहा, संध्याकाळचा चहा, गप्पा मारायला कुणी आलं तर चहा, डोकं दुखतंय तर चहा, कंटाळा आलाय तर चहा, थकवा आला असेल तरीही चहाच हवा असणारे अनेक चहाप्रेमी आहेत. चहा आरोग्यासाठी फार चांगला नसतो हे अनेकांना माहिती आहे. मात्र चहा बनविण्याच्या पद्धतीवर सर्व अवलंबून असतं. चहा पावडर, साखर आणि दूध घालण्याची योग्य पद्धत चहा किती चांगला हे ठरवतो.

चांगला चहा बनवणं का आहे आवश्यक? (Why Making Perfect Tea is Important?)

अनेकांना वाटतं की चहा बनवणं सोपं असतं. बस पाणी, दूध, चहापत्ती आणि साखर घाला, चहा तयार. मात्र खरं पाहता चहा बनवणं ही एक कला आहे. जर चहा बनविण्याच्या योग्य स्टेप्स फॉलो केल्या तर याचा स्वाद अनेकपटीने वाढतो. मात्र चुकीच्या पद्धतीने चहा बनवल्यास आरोग्य आणि मूड, चव या तिन्ही गोष्टींवर परिणाम होतो.

पहिली स्टेप – पाणी आणि चहा पावडर (Step 1: Water & Tea Leaves)

चहा बनवण्याची सुरुवात नेहमी पाणीपासून करावी. सर्वात आधी पातेल्यात पाणी घाला. पाणी उकळल्यानंतर त्यात चहापत्ती घाला. साधारण ४ ते ५ मिनिटं हे पाणी उकळवा. यावेळी हवं तर आलं किंवा वेलची घालू शकता. यामुळे चहाची चव अधिक वाढते.

दुसरी स्टेप – साखर कधी घालावी? (Step 2: When to Add Sugar?)

अनेकजण दूध घातल्यानंतर साखर घालतात. मात्र ही चुकीची पद्धत आहे. पाणी आणि चहापावडर उकळल्यानंतर साखर घालावी आणि छान मिसळून घ्यावी.

दूध घालण्याची योग्य वेळ (Step 3: Right Time to Add Milk)

साखर एकत्र झाल्यानंतर दूध घालावं. यानंतर चहा मंद गॅसवर पाच मिनिटं उकळवा. हळूहळू चहाचा रंग बदलेल आणि टेस्ट संतुलित राहील. ही योग्य चहा बनविण्याची पद्धत.

लोक करतात या चुका…

अनेकजणं पाणी, दूध, साखर, चहापत्ती एकत्र टाकतात. यामुळे चहाची चव बिघडते.
जास्त वेळ उकळवणे – जास्त वेळ चहा उकळल्याने चव वाढते असा अनेकांना गैरसमज असतो. मात्र चहा जास्त उकळल्याने त्याची चव कडू होते. याशिवाय अशा चहामुळे गॅस-अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

आरोग्य आणि चहाचं नातं

योग्य पद्धतीने बनवलेला चहा तुम्हीला फ्रेश करते आणि मूड चांगला होतोय मात्र चुकीच्या पद्धतीने केलेल्या चहामुळे पोटाचे आजार, अॅसिडिटी वाढू शकते. त्यामुळे नेहमी संतुलितपणे चहापत्ती, दूध आणि साखरेचा वापर करायला हवा.


About Author

Smita Gangurde

Other Latest News