पोट कमी करणं आता सोप्पं झालं; intermittent fasting ची जबरदस्त नवी पद्धत, वजन कसं होईल कमी?

सध्या इंटरमिटेंट फास्टिंगचा ट्रेंड खूप चर्चेत आहे.

Intermittent Fasting Benefits: सध्या इंटरमिटेंट फास्टिंगचा ट्रेंड खूप चर्चेत आहे. हा उपवासाचा प्रकार नाही तर खाण्याचं शेड्यूल आहे. यामध्ये तुम्हाला ठराविक वेळेत खायला हवं आणि इतर वेळी केवळ पाणी किंवा कमी कॅलरीजचे पेय घेऊ शकता.

वजन कमी करण्यात फायदेशीर

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, intermittent fasting मुळे शरीराला फॅट बर्न करण्यासाठी वेळ मिळतो. बराच वेळ काही खाल्लं नाही तर इन्शूलिन लेव्हल कमी होते आणि शरीर स्टोअर केलेलं फॅट ऊर्जेत परावर्तीत करतं. याच कारणास्तव लोक याला वजन व्यवस्थापनाचा शॉर्टकट मानतात.

केवळ वजन कमी करणं हाच हेतू नाही, तर…

या फास्टिंगचे अनेक फायदे असल्याचं सांगितलं जातं…

– पचनक्रिया सुधारते
– साखरेची पातळी नियंत्रणात राहते
– हृदयाचं आरोग्य सुधारतं
– मानसिक एकाग्रता आणि ऊर्जा वाढते
– म्हणजे हा ट्रेंड केवळ पोट कमी करण्यासाठी नाही तर एकूणच हेल्दी लाइफस्टाइलचा भाग आहे.

लोक intermittent fasting का करतात?

सोशल मीडियावर intermittent fasting करुन किती फायदा झाला याच्या ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी व्हायरल होत असतात. अनेक सेलिब्रिटींनी याचा स्वीकार केला आहे. सर्वात खास बाब म्हणजे यासाठी महागड्या सप्लिमेंट किंवा जिम मशीनची आवश्यकता नसते, केवळ वेळेचं व्यवस्थापन करायला हवं.

कोणी सावध राहायला हवं…

हा ट्रेंड सर्वांसाठी नाही. शुगर, बीपी, गर्भवती अशा प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असणाऱ्यांनी याचा स्वीकार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मार्गदर्शनाशिवाय बराच काळ उपवास करण्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.


About Author

Smita Gangurde

Other Latest News