Cold Coffee: घरीच बनवा कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी, कमी साहित्यात बनते झक्कास

Cold coffee recipe: कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी घरी कशी बनवायची? इथे पाहा सोपी रेसिपी

 cafe style cold coffee recipe:  कडक उन्हात एक कप कोल्ड कॉफी घशाला आणि मनाला आराम देते. बऱ्याचदा लोकांना कोल्ड कॉफीसाठी कॅफेमध्ये जायला आवडते. कॅफेमध्ये मिळणारी कॉफी महाग असते आणि तुम्ही ती पुन्हा पुन्हा पिऊ शकत नाही. पण याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्ही घरीच सर्वांसाठी चांगली कोल्ड कॉफी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोल्ड कॉफी बनवण्याचे साहित्य आणि सोपी  रेसिपी…

 

कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

 

थंडगार दूध – २ कप
कॉफी पावडर – ४ चमचे
बर्फाचे तुकडे – ४-५
चॉकलेट सिरप – ४-५ चमचे
व्हॅनिला आइस्क्रीम – २ टेबलस्पून
कोमट पाणी – २ टेबलस्पून
साखर – ४-५ चमचे

रेसिपी-

स्टेप १-
कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध गरम करा आणि ते थोडे घट्ट होऊ द्या. या प्रकारच्या घट्ट दुधापासून बनवलेली कॉफी खूप चविष्ट लागते. आता हे दूध काही तास थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

स्टेप २-
कोल्ड कॉफी बनवण्यासाठी, सर्वप्रथम, कॉफी पावडरमध्ये १ चमचा कोमट पाणी मिसळा. तुम्ही ते मिक्सरमध्येही काही सेकंद ढवळू शकता.

स्टेप ३-
आता मिक्सरमध्ये दूध, आईस्क्रीम, आईस क्यूब आणि साखर घाला आणि १ मिनिट फिरवा. कॉफीला फेस येईपर्यंत ढवळत राहा.

स्टेप ४-
कॉफीमध्ये चांगला फेस आला की तो बाहेर काढा.आता एका ग्लासमध्ये थोडे चॉकलेट सिरप घाला . यामुळे कॉफी ग्लास खूप छान आणि कॅफे स्टाईलचा दिसतो.

स्टेप ५-
आता हळूहळू ग्लासमध्ये कॉफी घाला आणि वर हलके चॉकलेट सिरप घाला. तुम्ही त्यात क्रीम देखील घालू शकता. तुम्ही वर कॅफेप्रमाणे कॉफी पावडर शिंपडा. यामुळे कॉफीची चव वाढते आणि ती आणखी छान दिसते.


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News