जेवल्यानंतर अनेकांना गोड पदार्थ खाण्याची आवड असते. परंतु, वाढत्या मधुमेहाच्या आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहावी यासाठी अनेकजण गोडाचे पदार्थ खाणे टाळतात. पण जर तुम्हालाही गोड पदार्थ खायचे असतील तर सोपी रेसिपी ट्राय करु शकता. नाचणी खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. नाचणीचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नाचणीचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत…
साहित्य
- नाचणीचे पीठ
- दूध
- ड्राय फ्रूट्स
- वेलची पावडर
- तूप
- साखर
कृती
- नाचणीचा हलवा बनवण्यासाठी कढई मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा.
- कढईत तीन ते चार चमचे तूप घालून नाचणीचे पीठ घालून सोनेरी होईपर्यंत भाजा.
- पीठ सोनेरी झाल्यावर त्यात दूध घालून शिजू द्या.
- मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.
- यानंतर, गूळ (किंवा साखर) आणि चिरलेले ड्राय फ्रुट्स (काजू, बदाम, पिस्ते) घाला.
- वेलची पावडर घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. मिश्रण घट्ट झाल्यावर आणि पॅनच्या कडांना चिकटत नाही तोपर्यंत शिजवा.
- हलवा तयार झाल्यावर गरमागरम सर्व्ह करा.












