Importance of Shankh : पूजेत शंखाचं महत्त्व काय आहे? महाभारत काळात श्रीकृष्ण आणि पांडवांकडे कोणता शंख होता?

हिंदू धर्मात शंख हा पूजेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. याच कारणास्तव प्राचीन काळापासून शंखाचा उपयोग धार्मिक आणि मंगल कार्यात केला जातो.

हिंदू धर्मात शंख हा पूजेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. याच कारणास्तव प्राचीन काळापासून शंखाचा उपयोग धार्मिक आणि मंगल कार्यात केला जातो. देवाच्या पूजेत अत्यंत शुभ मानले जाणारे शंख अनेक प्रकारचे असतात. यामध्ये मुख्यत्वे गणेश शंख, दक्षिणावर्ती शंख, वामावर्त शंख, मोती शंख, पांचजन्य शंख, भीम शंख आदींचा समावेश आहे.

धार्मिक कार्यात शंख का वाजवला जातो?

हिंदू धर्मात शंखाला अत्यंत पवित्र आणि मंगलदायक मानलं आहे. हिंदू मान्यतेनुसार, पूजा किंवा कोणत्याही मंगल कार्यात शंख वाजविल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते. धर्माचा मंगलदायक प्रतीक मानलेल्या शंखाच्या आवाजाने वातावरण पवित्र होतं. शंखाच्या ध्वनीने देवी-देवतांना जागं करण्याचा प्रयत्न केला जातो. मान्यतेनुसार, या मंगलमय ध्वनीने देवता प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.

श्रीकृष्णाचा पांचजन्य शंख

पांचजन्य शंख अत्यंत पवित्र मानला जातो. हिंदू मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाशी जोडलेला हा दिव्य शंख ज्या स्थानावर असतो , तेथे सुख-सौभाग्य पोहोचतं. पौराणिक कथांनुसार, हा शंख भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य नावाच्या राक्षसाला मारून मिळवला होता आणि याचा प्रयोग त्यांनी महाभारताच्या युद्धात युद्धाची सुरुवात आणि शेवटासाठी करीत होते. हिंदू मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचा शंखाने अभिषेक करणं अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं गेलं आहे. मान्यतेनुसार, लड्डू गोपालला दररोज दूध, पाणी आदीने स्नान केल्याने लवकरच त्यांची कृपाप्राप्ती होते.

पांडवांच्या शंखाचं नाव काय होतं?

महाभारत काळात पाच पांडव आणि कौरवांमधील प्रमुख मानला जाणाऱ्या दुर्योधनकडे स्वत:चा शंख होता. अर्जुनजवळ देवदत्त नावाचा तर भीमाकडे पौंड्र शंख होता. तर पांडवांमधील सर्वात मोठा युधिष्ठिरकडे अनंतविजय नावाचा शंख होता. नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता. दुर्योधनाजवळ विदारक नावाचा शंख कर कर्णाजवळ हिरण्यगर्भ नावाचा शंख होता.

शंखाशी संबंधित विशेष गोष्टी

– शंखाची उत्पत्ति समुद्र मंथनापासून झाली, म्हणून याला माता लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं. त्यामुळे लक्ष्मीची इच्छा बाळगणाऱ्यांच्या पूजेत प्रतिदिवस शंख जरूर वाजवायला हवा आणि त्याची पूजाही करायला हवी.
– सनातन परंपरेत दक्षिणवर्ती शंख भगवान विष्णूचं प्रतीक मानलं जातं. हा शंख भगवान विष्णूशिवाय माता लक्ष्मी आणि देवी दुर्गेच्या हातातही पाहायला मिळतं.
– मूल होण्याची इच्छा बाळगणारे लोक आपल्या घरात गणेश शंखाची दररोज पूजा करतात. तर दक्षिणवर्ती शंखाचा संबंध भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीशी आहे. मान्यतेनुसार, ज्या घरात दक्षिणावर्ती शंख असतो, तेथे माता लक्ष्मी कायमची राहते.
– वास्तूशास्त्रानुसार, शंख नेहमी घरातील पूजा घराच्या उत्तर किंवा पूर्वेकडे ठेवाव. या दिशेला ठेवलेला शंख शुभफळ देतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Smita Gangurde

Other Latest News