तुम्हाला थकवा, अशक्तपणा, चक्कर आणि आळसावल्यासारखं वाटतं, हे संकेत तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे असू शकतात. मासिक पाळीमुळे महिलांना हिमोग्लोबिनच्या कमतरतेचा त्रास होणं कॉमन आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या डेटानुसार, भारतात १५ ते ५० वर्षांदरम्यान साधारण २६ टक्के पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते. महिलांबद्दल सांगायचं झालं तर ५७ टक्के महिला अॅनिमियाशी पीडित आहेत. जर तुम्हाला अशक्त वाटत असेल, सतत थकवा जाणवत असेल आणि केसगळतीसारखा त्रास होत असेल तर तुमच्यातही रक्ताची कमतरता जाणवत असल्याचं दिसतं. काही साधे पदार्थ डाएटमध्ये सामील केल्याने तुमच्या शरीरात रक्ताची पातळी वाढले आणि अॅनिमिया दूर होऊ शकतो.
बीट

बिटामुळे हिमोग्लोबिन वाढतं. हा सर्वात प्रभावी आणि विश्वासू उपाय आहे. यामध्ये लोह, फोलेट आणि विटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे लाल रक्तपेशींची निर्मिती होते. जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर आपल्या आहारात बिटाचा समावेश करावा.
कसं सेवन कराल?
बिटाचा रस पिणं सर्वात प्रभावी पद्धत आहे
सॅलेड किंवा भाजीच्या रुपात तुम्ही याचं सेवन करू शकता.
चांगल्या परिणामासाठी तुम्ही याच्या रसाचं सेवन सकाळी रिकाम्या पोटी करू शकता.
गूळ आणि काळे तीळ
गुळात आर्यन असतं जे लाल रक्त पेशी तयार करण्यासाठी मदत करते. जेव्हा तुम्ही काळ्या तिळासोबत गूळ खाता तेव्हा तुम्हाला दुप्पट फायदा मिळतो.
खजूर
खजूर नैसर्गिकपणे आर्यन वाढवतं, शिवाय यातील नैसर्गिक साखर, फायबर आणि अँटीऑक्सिडेंट शरीराला ऊर्जादेखील देते. जर तुम्ही नैसर्गिकपणे हिमोग्लोबिन वाढवू इच्छित असाल तर खजूर आपल्या डाएटमध्ये सामील करा. सकाळी उठल्यानंतर किंवा सायंकाळच्या स्नॅकमध्ये खजूर खाऊ शकता.
डाळिंब
डाळिंबामध्ये आर्यन, विटॅमिन सी आणि पॉवरफुल अँटीऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे तुमचा रक्तप्रवाह चांगला होता आणि तुमच्या एकूण आरोग्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











