हिवाळा सुरू झाला की आपल्या आहारात असे पदार्थ समाविष्ट करावे लागतात जे शरीराला उबदार ठेवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशा पदार्थांमध्ये मेथीचे लाडू हा एक पारंपरिक आणि पौष्टिक पर्याय आहे. चला तर पाहूया घरच्या घरी पौष्टिक आणि चविष्ट मेथीचे लाडू कसे बनवायचे….
साहित्य
- मेथीचे दाणे
- गव्हाचे पीठ
- साजूक तूप
- डिंक
- सुके खोबरे
- सुका मेवा (काजू, बदाम, अक्रोड)
- गुळ
- खसखस
कृती
- मेथीचे दाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- एका कढईत थोडे तूप गरम करून त्यात डिंक तळून घ्या.
- त्याच कढईत मेथीच्या पिठात तूप घालून खमंग भाजून घ्या.
- पीठ भाजल्यावर त्यात किसलेले खोबरे, सुके मेवे आणि खसखस घालून परतून घ्या.
- गॅस बंद करून त्यात बारीक केलेले मेथीचे दाणे आणि तळलेला डिंक घाला.
- शेवटी गूळ घालून सर्व मिश्रण एकत्र करा.
- मिश्रण गरम असतानाच हाताने लहान गोल लाडू वळा. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.
- मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी दाणे रात्रीभर भिजवून दुसऱ्या दिवशी भाजू शकता.
- हे लाडू हिवाळ्यात रोज सकाळी एक खाल्ल्यास शरीराला ताकद मिळते.
- तुम्ही गूळाऐवजी साखर न वापरणं चांगलं, कारण गूळ जास्त पौष्टिक असतो.












