कार्तिकी एकादशी यात्रेसाठी 1,150 जादा बसेस धावणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

पंढरपूर येथे 2 नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक- प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातून एसटी महामंडळ तब्बल 1150 जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे.

पंढरपूर कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एमएसआरटीसीने १,१५० अतिरिक्त बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रभागा बस स्टँडवरून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे आणि सवलतीच्या दरात भाडेही उपलब्ध आहे. अशी माहिती समोर आली आहे.  त्यामुळे या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कार्तिकी एकदाशी यात्रेसाठी जादा बसेस 

यंदा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे 2 नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक- प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातून एसटी महामंडळ तब्बल 1150 जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. पंढरपूर येथील एसटी महामंडळाच्या ‘ चंद्रभागा ‘ या यात्रा बसस्थानकावरून दिनांक 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक केली जाणार आहे.

या बसस्थानकावर 17 फलाट असून सुमारे 1000 बसेस लावण्याची सुसज्ज पार्किंग व्यवस्था या ठिकाणी आहे. तसेच सर्व एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या राहण्याची सोय देखील या बसस्थानकामध्ये करण्यात आली आहे. यात्रे दिवशी एसटी बसेस मुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चंद्रभागा बसस्थानकावर तब्बल 120 पेक्षा जास्त एसटी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. वाहन दुरुस्ती व देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूर शहराच्या बाहेर मार्गस्थ बिघाड वाहने दुरुस्त करण्यासाठी पथके तैनात करण्यात येणार आहेत.

थेट गावातून पंढरपूरला जाता येणार ?

यात्रा कालावधीमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास आपल्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाने बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे या गट आरक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी 50 टक्के व 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास करण्याची सवलत लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी भाविक प्रवाशांनी येता -जाता आपल्या गावातून गट आरक्षण करावे असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. त्यामुळे एसटीच्या या निर्णयाचा भाविकांना मोठा फायदा या काळात होणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News