महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान विभागाने 14 ते 15 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हवामानात बदल दिसून आला असून, 13 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. काही जिल्ह्यांमध्ये बुधवारी मुसळधार पावसाचे नजारे पाहायला मिळाले.कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार ते अतिवृष्टीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने धोक्याचा इशारा जारी केला आहे. तसेच, अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण, मराठवाडा-विदर्भात तुफान बरसणार!
कोकणात आज जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला पावसाने पाठ फिरवल्यानंतर शेतकरी राजा चिंतेत होता. पिकांना पावसाची गरज होती. आता पावसाला सुरूवात झाल्याचे बघायला मिळतंय. राज्यातील काही भागांमध्ये ऑगस्ट महिना आला असला तरीही म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याचे चित्र बघायला मिळतंय. दरवर्षीपेक्षा यंदा राज्यात मॉन्सून लवकरच दाखल झाला होता.बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात शहरासह घाट विभागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
विशेष म्हणजे सुरूवातीच्या काळात दमदार पाऊसही झाला. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा काही भागांमध्ये दिला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्राला मान्सूचा येलो अलर्ट जारी केलाय. मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भाला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील पाऊस दिवस राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. पुढील पाच दिवस राज्यासाठी धोक्याचे असणार आहेत. नागरिकांना या काळात सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय नदीकाठच्या प्रदेशातील लोकांना या काळात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. प्रशासनाकडून तशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.





