ठाकरे बंधू एकत्र आल्यास राजकारणात काय होणार बदल? काँग्रेस स्वबळावर निवडणूक रिंगणात?

भावाची साथ हवी असल्यास उद्धव यांना काँग्रेसचा हात सोडावा लागेल. काँग्रेसची साथ सोडल्यास मुस्लीमांसह परप्रांतिय मतं ठाकरेंच्या शिवसेनच्या हातून जावू शकतात.

मुंबई – मुंबईतील राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दृष्टीनं पावलं पडताय. काल दोन्ही भावांमध्ये युतीच्या संबंधानं अडीच तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांनी भेट दिली. या भेटीत पहिल्यांदाच राजकीय चर्चा झाली असल्याचं सांगत पुढीच रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात दोन्ही बाजडूंचे नेते ही भे कौटपंबिक असल्याचं सांगत स्पष्टपणे काहीही सांगताना दिसत नाहीयेत. मात्र ठाकरे बंधू मुंबईसह राज्यातील काही महापालिका निवडणुकांत एकत्रित रणांगणात असतील अशी चर्चा आहे.

या सगळ्या स्थितीत उद्धव आणि राज ठाकरेंच्या संभाव्य युतीमध्ये महाविकास आघाडीचा अडसर आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे मविआत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट संकेत मिळताय. हा विचारसरणी आणि ध्येयधोरणाचा मुद्दा आहे असं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी म्हटलंय

काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता

ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील जवळीक वाढत असल्यानं महाविकास आघाडीतल्या काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. परप्रांतियांबाबतची आणि प्रखर हिंदुत्त्ववादी राज ठाकरेंच्या या भूमिका काँग्रेसला मान्य होणाऱ्या नाहीत. तर काँग्रेसमुळं राज ठाकरेही महाविकास आघाडीत जाणार नाही हे स्पष्ट आहे. अशा परिस्थित काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं बोललं जातंय

ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेस स्वतंत्र लढणार ?

1. महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढायचं की मविआत, काँग्रेससमोर पेच
२. ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेस इतर घटक पक्षांसह स्वतंत्र लढण्याची शक्यता
३. काँग्रेस आणि आघाडीतील इतर पक्ष एकत्र लढल्यास तिहेरी, चौरंगी लढती
४. ठाकरेंची शिवसेना सोबत नसल्यानं काँग्रेससह आघाडीतील पक्षांच्या पदरात जास्त जागा
५. मुस्लीम, दलित आणि उ. भारतीयांमधील काँग्रेसच्या मतांचा कस लागणार
6. महापालिकेला स्वतंत्र आणि जिल्हा परिषद, पंतायत समितीला एकत्र येण्याचीही शक्यता
7. मराठीच्या मुद्द्यावर महायुती आणि ठाकरेंच्या मतविभाजनाचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता
8. मुंबईसह राज्यात काँग्रेसच्या स्वबळाची परीक्षा होण्याची शक्यता

राज ठाकरे मविआत सहभागी होण्याची शक्यता फारच कमी 

त्यामुळं भावाची साथ हवी असल्यास उद्धव यांना काँग्रेसचा हात सोडावा लागेल. काँग्रेसची साथ सोडल्यास मुस्लीमांसह परप्रांतिय मतं ठाकरेंच्या शिवसेनच्या हातून जावू शकतात. अशा परिस्थितीत भावासाठी उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार का? ठाकरे बंधू एकत्र आल्यावर राजकारण कसं बदलणार याकडे राज्याचं लक्ष असेल


About Author

Smita Gangurde

Other Latest News