Tulasi Vivah 2025: तुळशी विवाह कधी आहे? तारीख, मुहूर्त आणि पूजेचा विधी जाणून घ्या!

दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. हा उत्सव भगवान विष्णू आणि माता तुलसी यांच्यातील प्रेमाचे प्रतीक मानला जातो.

हिंदू धर्मात तुळशी विवाहाचे अत्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात तुलसीचे व्रत व विवाह केले जातात. तुलसीला भगवान विष्णूची प्रत्यक्ष रूप मानले जाते आणि तिचा विवाह म्हणजे धार्मिक समृद्धी, आरोग्य आणि घरातील आनंद सुनिश्चित करतो. घरातील स्त्रिया या सोहळ्यात सहभागी होऊन घरातील सुख, संपत्ती आणि कुटुंबातील ऐक्याची कामना करतात. तुलसी विवाहामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पितृस्मृती, आरोग्य आणि समृद्धी लाभते असे मानले जाते. २०२५ मध्ये तुळशी विवाह नेमका कधी आहे? योग्य मुहूर्त आणि पूजा विधीबाबत सविस्तर जाणून घेऊ…

तुळशी विवाह २०२५

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरा होणारा हा सोहळा भगवान विष्णू आणि तुळशीच्याअतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. ज्यांच्या घरी तुळस आहे आणि तिला छान मंजुळा आल्या आहेत, त्यांच्या घरात हा विवाह मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. घरात तुळशी विवाह केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आणि कृपा कुटुंबावर कायम राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

द्वादशी तिथीची सुरुवात: 2 नोव्हेंबर 2025 रोजी, सकाळी 07:31 वाजता.

द्वादशी तिथीची समाप्ती: 3 नोव्हेंबर 2025 रोजी, सकाळी 05:07 वाजता…उदय तिथीनुसार, तुळशी विवाह 2 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा केला जाईल.

  • सूर्योदय: सकाळी 06:34 वाजता
  • सूर्यास्त: संध्याकाळी 05:35 वाजता
  • चंद्रोदय: दुपारी 03: 21 वाजता
  • चंद्रोदय: सकाळी 03:50 वाजता
  • 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 03:50 वाजता
  • ब्रह्म मुहूर्त – सकाळी 04:50 ते सकाळी 05:42 वाजता
  • विजय मुहूर्त – दुपारी 01:55 ते 02:39 पर्यंत
  • गोधूळ मुहूर्त – संध्याकाळी 05:35 ते सकाळी 06:01 पर्यंत
  • निशिता मुहूर्त – रात्री 11:39 ते 12:31 पर्यंत

पूजेचा विधी आणि योग्य पद्धत

धार्मिक विधीनुसार तुळशी विवाह केल्यास जीवनातील सर्व प्रकारची संकटे दूर होतात आणि तुळशी मातेचे आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे. पूजेचे साहित्य घरी आणल्यानंतर तुळशीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. तुळस जर कुंडीत असेल, तर ती कुंडी किंवा वृंदावन सुशोभित करावे. शुभ मुहूर्तावर तुळशीची पूजा करावी. तुळशीला साज-श्रृंगार, फळे, फुले, हार, हळद आणि कुंकू अर्पण करावे. धूप, दीप आणि अगरबत्ती लावून पूजा करावी. श्रीकृष्णाची किंवा बाळकृष्णाची मूर्ती तुळशीच्या समोर चौरंगावर ठेवून पूजा करावी. यानंतर अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणावे आणि तुळशीचा विवाह संपन्न करावा. काही भक्त स्वतः घरी पूजा करतात, तर काहीजण ब्रम्हणांना बोलावून हा विवाह पार पाडतात.

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.


About Author

Rohit Shinde

Other Latest News